Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions | लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, 72 तासात तीन मंत्रिमंडळ बैठका अन् 62 निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions | आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक संपेपर्यंत राज्य सरकारला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने अनेक मोठे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. त्यासाठी एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठ झाली. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 45 महत्त्वाचे निर्णय घेतले होते. तर आज झालेल्या बैठकीत आणखी 17 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने एका आठवड्यात तब्बल 62 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे:

  1. मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला (गृह विभाग)
  2. १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता. (विधी व न्याय)
  3. संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार (गृह विभाग)
  4. संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार (गृह विभाग)
  5. राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार (गृह विभाग)
  6. राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी (उद्योग विभाग)
  7. तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार (वैद्यकीय शिक्षण विभाग)
  8. संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार (सांस्कृतिक कार्य)
  9. शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण (सांस्कृतिक कार्य)
  10. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल (इतर मागास)
  11. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ. (पशुसंवर्धन विभाग)
  12. हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना (सामाजिक न्याय विभाग)
  13. ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान (परिवहन विभाग)
  14. भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप (महसूल विभाग)
  15. वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन (सांस्कृतिक कार्य)
  16. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर (सामान्य प्रशासन विभाग)
  17. श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल व वन)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kondhwa Crime | किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी वस्तूने मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Shivsena UBT Leader Ambadas Danve | उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?, नाराज अंबादास दानवे यांनी स्वत: केला खुलासा, ”एकनाथ शिंदेंबरोबर…”

Pune Hadapsar Crime | पुणे : आर्थिक व्यवहारातून युवकाचे अपहरण, सोलापूर येथे नेऊन लुटले

पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार, दोघांना अटक