पालकांसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतेय अनुष्का शर्मा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएल – 2020 (IPL 2020) दरम्यान दुबईत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार पती विराट कोहलीसोबत ( Virat Kohli) बराच वेळ घालवल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) मुंबईत परतली आहे. येथे ती तिच्या पालकासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसत(anushka-sharma-enjoys-tea-time-father-virat-kohlis-absence) आहे. नेहमीच विराटसह दिसणारी अनुष्काने आता तिच्या पालकांसह निवांत क्षण एन्जॉय करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

अनुष्का संध्याकाळी आरामात गप्पा गोष्टी करत असल्याचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या फोटोत गुलाबी रंगाच्या सलवार-सूटमध्ये तिचे सौंदर्य़ अधिकच खूलून दिसत आहे. अनुष्का बाल्कनीच्या खुर्चीवर विश्रांती घेत आणि कॅमेर्‍याकडे पहात हसताना दिसत आहे. त्याच वेळी तिच्या वडिलांचे प्रतिबिंब देखील आरशात दिसून येत आहे. यावर अनुष्काने या फोटोसाठी एक समर्पक असे कॅप्शनही लिहिले आहे. अनुष्काचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. यापूर्वीही अनुष्काने दिवाळीच्या दिवशी पारंपारिक ड्रेसमध्ये फोटो शेअर केले होते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपली गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. गुड न्यूज जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत अनुष्काचे स्टायलिश आणि मोहक अवतार चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. जेवलीस का..? याच प्रश्नामुळे अनेक मुलांचा संवाद सुरू होता. लाखो मराठी तरुण तरुणींना विचारत असलेला हाच प्रश्न आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला विचारला आहे. तोही थेट अगदी मैदानावरून.

You might also like