API Anand Malale Suicide Case | माझ्या पतीने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं, एपीआय आनंद मळालेंच्या पत्नीचा गंभीर आरोप

चिमू, पिल्लू मला माफ करा. मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान दिले नाही, सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा व्हॉट्सअ‍ॅपवर भावूक संदेश

सोलापूर : API Anand Malale Suicide Case | नांदेड पोलीस (Nanded Police) दलातील एपीआय आनंद मळाले यांनी सोलापूरमधील कुमठा नाका येथील सोसायटीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने राज्यातील पोलीस दलात खळबळ (Maharashtra Police) उडाली आहे. दरम्यान, मृत मळाले यांच्या पत्नी वंदना मळाले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. (API Anand Malale Suicide Case)

वंदना मळाले यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्या पतीला वरिष्ठांकडून खूप त्रास दिला जात होता. गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होते. त्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी वंदना मळाले यांनी केली. (API Anand Malale Suicide Case)

दरम्यान, सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आनंद प्रकाश मळाले यांचा मृतदेहावर पोस्टमार्टमसाठी आणला होता. यावेळी सोलापूर पोलीस दलातील अधिकारी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात उपस्थित होते. मृत आनंद मळाले यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार त्यांच्या मुळ गावी उस्मानाबाद (धाराशिव) येथे होणार आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

मृत आनंद मळाले यांचा मृतदेह सोलापूर शासकीय रुग्णालयात आणला असताना पत्नी वंदना मळाले, मुलगा व
आईने हंबरडा फोडला. मळाले यांच्या आई दु:खावेगाने बेशुद्ध पडल्या. जिवाचं रान करून पोराला मोठं केलं, खूप हुशार मुलगा होता, असा कसा सोडून गेला, तुला टेन्शन होत तर मला सांगायचं होतं, असं बोलत आईने हंबरडा फोरडला.

पत्नीला पाठवला मेसेज…

एपीआय आनंद मळाले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज पाठवला होता.
या मेसेजमध्ये लिहिले आहे… चिमू, पिल्लू मला माफ करा. मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान दिले नाही.
माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करुन चांगल्या भविष्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल.
पिल्लूला माझे शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. माझ्या पँटच्या डाव्या खिशात चिठ्ठी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP Leader Vijayraj Shinde Car Accident | भाजपा नेत्याच्या कारला एसटीची धडक, एअरबॅगमुळे जीव वाचला