BJP Leader Vijayraj Shinde Car Accident | भाजपा नेत्याच्या कारला एसटीची धडक, एअरबॅगमुळे जीव वाचला

अकोला : BJP Leader Vijayraj Shinde Car Accident | अकोला-मुर्तिजापूर महामार्गावरील कुरणखेड येथे बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार आणि भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या गाडीला एसटीने जोरदार धडक दिली. या अपघातात एअरबॅगमुळे शिंदे यांचा जीव सुदैवाने बचावला. शिंदे यांना किरकोळ मार लागला असून उपचारासाठी त्यांना अकोला येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात दोन्ही वाहनातील एकुण ८ जण जखमी झाले आहेत. (BJP Leader Vijayraj Shinde Car Accident)

राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी १२ वाजता हा अपघात घडला. अपघातात शिंदे यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत. तर एसटी बसमधील दोन विद्यार्थी तसेच दोन वयोवृद्ध महिला जखमी झाल्या आहेत. (BJP Leader Vijayraj Shinde Car Accident)

शिंदे यांची गाडी बुलढाण्यावरून अमरावतीच्या दिशेने निघाली होती. तर एसटी बस अकोल्याच्या दिशेने जात होती. या दोन्ही गाड्यांची कुरणखेड गावाजवळील नवीन वस्ती गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात बुलढाण्याचे भाजपा माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह त्यांचे चार सहकारी, बसमधील दोन शाळकरी विद्यार्थी, दोन वयोवृद्ध महिला जखमी झाल्या.

आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रंजीत घोगरे, शहाबाज शाहा, विरेंद्र देशमुख, राम उमाळे, विजय माल्टे, मोहण वाघमारे,
शेख माजिद यांनी जखमींना कुरणखेड येथील माँ चंडिका रूग्णालयात पोहोचवले. दरम्यान, आपत्कालीन बचाव पथकाने अपघातानंतर महामार्गवरील वाहतूक सुरळीत केली.

घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे योगेश काटकर हे घटनास्थळी दाखल झाले होते.
भाजपा आमदार अपघातात जखमी झाल्याचे समजताच घटनास्थळी भाजपच्या कार्यकत्र्यांनी गर्दी केली होती.
यामध्ये भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे, भाजपाचे प्रशांत ठाकरे, अमन महल्ले, किरण उमाळे
तथा भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro News | रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाची विस्तारित सेवा येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरु होणार