Apple ची उत्पादने खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ; ! सेलमध्ये मिळतोय प्रचंड डिस्काउंट

पोलिसनामा ऑनलाईन – अ‍ॅमेझॉनवर पुन्हा एकदा Apple डेज सेलचे आयोजन केले आहे. हे लाईव्ह असून 17 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Apple च्या (iPhone 12 mini, MacBook Pro, iPad Pro आणि iPhone 11) आयफोन 12 मिनी, मॅकबुक प्रो, आयपॅड प्रो आणि आयफोन 11 यासह अनेक उत्पादनांवर डिस्काउंट अर्थात सूट दिली जात आहे. तसेच बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत. एचडीएफसी (HDFC) कार्डवर ग्राहकांना विना-किंमत ईएमआय (EMI ) पर्यायदेखील देण्यात येत आहे. तर, मग, काही चांगले सौदे जाणून घेऊया;

आयफोन 12 मिनी (iPhone 12 mini) 67,100 रुपयांमध्ये विक्री दरम्यान खरेदी करता येईल. हे भारतात 69,900 रुपयांमध्ये बाजारात आणले गेले. तसेच एचडीएफसी (HDFC) बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यावर 6,000 रुपयांची डिस्काउंट अर्थात सूट देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना ते 61,100 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. या किंमतीत, ग्राहकांना 64 जीबी (GB) स्टोरेज वेरिएंट मिळेल.

आयफोन 12 प्रो (iPhone 12 Pro) बद्दल बोलायचे झाले तर ते Amazon अमेझॉनवर 1,19,900 रुपयांत लिस्ट केले गेले आहे. मात्र, यावर एचडीएफसी (HDFC) बँकेकडून 5 हजार रुपयांची डिस्काउंट अर्थात सूट, ऑफरदेखील देण्यात येत आहे.

IPhone डेज सेलमध्ये आयफोन 11 (iPhone 11) चे 64 जीबी स्टोरेज विक्रीसाठी 51,999 रुपयांमध्ये उपलब्ध केले आहे. हे भारतात 64,900 रुपयांत लाँच केले गेले. साइटवर या दोन्ही फोनवर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहेत.

मॅकबुक, आयपॅड्स (MacBook, iPads) बद्दल बोलायाचे झाले तर Mac अमेझॉनवर नवीन मॅकबुक प्रो (13 इंच) (MacBook Pro (13-इंच)) ला 7,000 रुपयांची डिस्काउंट अर्थात सूट दिली आहे. तसेच सवलतीच्या फायद्याचा लाभ फक्त एचडीएफसी (HDFC) बँक क्रेडिट कार्डवर मिळेल. त्याचबरोबर जुन्या लॅपटॉपची देवाणघेवाण करून तुम्ही 18,850 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळवू शकता.

त्याचप्रमाणे सन 2020 मध्ये लॉन्च केलेला आयपॅड प्रो (iPad Pro) Amazon अमेझॉनवर 71,900 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. एचडीएफसी बँक कार्डद्वारे ग्राहकांना या डिव्हाइसवर 4,000 रुपयांची सूट मिळू शकते. त्याचबरोबर जुन्या उपकरणांची देवाणघेवाण करूनही ग्राहकांना 12,550 रुपयांची सूट मिळू शकते.