अ‍ॅप्पलचे iPhone 11 सह अनेक डिव्हाइस आज होणार लाँच, जाणून घ्या ‘किंमत’ आणि ‘खासियत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज रात्री 10:30 वाजता अ‍ॅपलच्या सॅन जोसयेथील हेड ऑफिसमध्ये एक स्पेशल इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या विशेष कार्यक्रमात अ‍ॅपलतर्फे आयफोनची एक नवी जनरेशन लॉंच करण्यात येणार आहे. त्यामध्ये  iPhone 11, iPhone 11 Pro, आणि iPhone 11 Pro Max यांचा समावेश आहे. 

लाँच होणार  iPhone 11 सीरीज-

अ‍ॅपलने iPhone XR ला रिप्लेस करणारा iPhone 11 बाजारात आणला आहे.

 iPhone 11 ची वैशिष्ट्ये-

iPhone 11 च्या डिजाईनमध्ये मोठा बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. हा फोन 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी क्षमतेमध्ये मिळू शकतो. यामध्ये 12 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल क्षमतेचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात येण्याचीही शक्यता आहे

काय असेल किंमत ?

iPhone 11ची किंमत जवळपास 749 डॉलर म्हणजेच भारतातील जवळपास 53800 रुपये इतकी असेल iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या फोनची किंमत 71700 आणि 78900 रुपये असू शकते. नेमकी किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल.

कसा पहाल इव्हेंट ?

कंपनीचा हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार, रात्री साडे दहा वाजता सुरू होणार आहे. यासाठी कंपनीच्या युट्युब पेजवर इंव्हिटेशन पाठवण्यात आलं आहे. ही पहिलीच वेळ असणार आहे की, कंपनी हा इव्हेंट युट्युब पेजवर लाईव्ह प्रसारीत करणार आहे. याशिवाय कंपनीच्या साईटवरही व्हिडीओ पाहता येणार आहे. iPhone, iPad, iPod touch model (iOS 10 or above) किंवा  Mac computerवर सफारी ब्राऊजरचा प्रयोग केला जाऊ शकतो.