20 हजार रुपयांनी स्वस्त झाला iPhone !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आयफोन घ्यावा ही प्रत्येकाच्या मनातील सुप्त इछा असते. अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आयफोन कायमच ठरला आहे. मात्र, त्याच्या वाढीव किंमतीमुळे प्रत्येकाला आयफोन घेणं शक्य होत नाही. मात्र आता आयफोन घेण्याची स्वप्नपूर्तीसाठी पूर्ण होणार आहे. आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता फेसबुकने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली.

आजपासून (२६ डिसेंबर) फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक सेल सुरू झाला आहे. सेलसाठी लाईव्ह आलेल्या फ्लिपकार्टच्या पेजवरून याबाबत माहिती देण्यात आली ज्यात ICICI बँकेच्या कार्डाद्वारे शॉपिंग केल्यास १० टक्क्यांची सुटही देण्यात येणार आहे. यामध्ये स्मार्टफोन्सवर चांगल्याच ऑफर देण्यात येत आहेत. याच सेलमध्येच iPhone 11 Pro या फोनवर अतिशय मोठी सुट देण्यात आली असून हा फोन घेणाऱ्यांसाठी २० हजारांपर्यंतची सुट देण्यात आली आहे. डिस्काउंट मिळाल्यानंतर तुम्ही हा फोन फक्त ७९९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची बाजारातील किंमत ९९,९९९ रूपये एवढी असून या फोनवर तब्बल २० हजारांची सुट दिली आहे.

फ्लिपकार्टच्या ‘इलेक्ट्रॉनिक सेल’ या विभागात तुम्हाला हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसेल. आयफोन घेणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही आजच हा फोन खरेदी करून या सेलचा उपयोग करून घेऊ शकता. ग्राहक या फोनवर एक्सचेंज ऑफरचा फायदाही घेऊ शकणार आहेत. ज्यात तुम्हाला २६, ६०१ पर्यंतची एक नवीन ऑफरही मिळणार आहे.

iPhone 11 Proचे खास फिचर्स
– iPhone 11 Proमध्ये ५.८ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओलेड डिस्प्ले आहे.
– या फोनची स्क्रीन हिपॅटीक टचला सपोर्ट करते.
– हा फोन टेक्सचर्ड मेटल ग्लास आणि स्टेनलेस स्टील डिझाईन्ड आहे.
– ip68 अशी रेटिंग या फोनला मिळाली आहे.
– A13 बायोनिक चिपसेटचा वापर या फोनमध्ये केला गेला आहे.
– यात Third Generation neural Engine आहे.

जाणून घ्या आणखी काही फिचर्स
iPhone 11 Proच्या रियरवर तीन-तीन कॅमेरे आहेत. यामुळे अ‍ॅपलने याला प्रो कॅमेरा सिस्टिम असे नाव दिले आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचे तीन सेन्सर्स आहेत. हा फोन एफ/ 1.8 वाइड एंगल, एफ/ 2.4 अल्ट्रा-वाइड-अँगल आणि एफ/ 2.4 टेलीफोटो लेंस आहे. वाइड-अँगल आणि टेलीफोटो कॅमरे ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशनसोबत येतात. या फोनमध्ये इनहान्सड नाईट मोडही आहे. अपडेटेड पोर्ट्रेट मोड, स्मार्ट एचडीआर सारखे फीचरही उपलब्ध आहेत. हा फोन १२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासोबत येणार असून आपला सेल्फी घेण्याचा आनंद द्विगुणित करेल.