‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी चेहरा अन् अंगाला ओरबडून दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री मंजिरी पुपाला ही सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने एक फोटो शेअर केला असून तो पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. तिने इंस्टाग्रामवर जो फोटो शेअर केला आहे. त्यात तिच्या हातात केक पहायला मिळतो आहे. इतकेच नाही तर तिच्या चेहऱ्याला आणि अंगालाही केक लागल्याचे पहायला मिळते आहे. तिने हा फोटो शेअर करत चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

https://www.instagram.com/manjiripupala/?utm_source=ig_embed

मंजिरीने दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनंतर ग्रहण या मालिकेत ती झळकली. याशिवाय ती मराठी चित्रपट पार्टीमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती. तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील ‘इश्कबाझ – प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत तिने एसीपी आदिती देशमुखची भूमिका साकारताना दिसली होती. तसेच मंजिरी नेटफ्लिक्सवरील बेताल या वेबसीरिजमध्ये एका आदिवासी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.

https://www.instagram.com/manjiripupala/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/manjiripupala/?utm_source=ig_embed