Archana Puran Singh | अर्चना पूरन सिंहला नेटकरी म्हणाले पुरुषांसारखी दिसते; त्यावर अर्चनाने दिले चोख उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) अनेक वर्षापासून काम करत आहे. मात्र सध्या ती टी व्ही वरील लोकप्रिय कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये जज म्हणून झळकत आहे. शोमध्ये अनेकदा कॉमेडियन कपिल शर्मा (Comedian Kapil Sharma) अनेक वेळा अर्चनाची खिल्ली उडवताना दिसतो. मात्र अर्चना (Archana In Kapil Sharma Show) नेहमी खुल्या मनाने हे जोक स्वीकारते व मन भरुन हासते. कपिल नेहमी अर्चनाच्या फीवरुन तिला चिडवताना दिसून येतो. मात्र यावेळी सोशल मीडियावर अर्चनाला (Archana Puran Singh) एका नेटकऱ्याने पुरुषांप्रमाणे दिसतेस असे बोलले. त्याच्या या कमेंटवर अर्चनाने देखील चोख उत्तर दिले. सध्या सोशल मीडियावर तिच्या याच रिप्लायची चर्चा आहे.

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह नेहमी हसून खेळून राहताना दिसते. अर्चना कपिल शर्मा शो मध्ये देखील अनोख्या अंदाज मध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. अनेकदा कपिल तिच्यावर हास्याविनोद करतो ती ते मस्तीमध्ये घेते. अर्चना सोशल मीडियावर देखील सक्रिय असून अनेकदा आपल्या लाईफ अपडेट शेअर करत असते. सध्या तिने तिच्या पतीसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा एक तिचा थ्रोबॅक असलेला फोटो आहे. यामध्ये अर्चना मस्त हेअर लूकमध्ये तिच्या पतीसोबत दिसून येत आहे. यावर अनेकांनी तिला कमेंट केल्या आहेत. मात्र एका नेटकरीची कमेंट तिला रुचली नसून (Archana Reply On Instagram) तिने त्या महिलेला चोख उत्तर दिले आहे.

अर्चना पूरन सिंह हिच्या इंस्टाग्रामवरील फोटोला एका महिला युजर्नने कमेंट केली आहे की, ‘तू स्त्री कमी व पुरुषासारखी जास्त दिसतेस.’ नेटकऱ्यांच्या या वाईट कमेंट वर अर्चनाने देखील तिला चांगलेच सुनावले आहे. महिला असून महिलेचा सन्मान करत नाही ही गोष्ट अर्चनाला अजिबात आवडलेली नाही. तिच्या उत्तराने अर्चानाला बोलणाऱ्या महिलेची बोलती बंद झाली आहे. तिला रिप्लाय देत अर्चना म्हणाली की, “किती वाईट विचार आहेत तुझे. तू थोडंसं लिहिलं वाचलं असतं तर कदाचित मोठ्यांशी कसं वागायचं हे कळलं असतं. सर्व वयोगटातील, सर्व आकार, साइज आणि सर्व अपियरसंच्या स्त्रियांचा आदर करा. पुरुषांकडून आदराची अपेक्षा कशी करता येईल. जेव्हा स्त्रिया स्वतः इतर स्त्रीयांचा आदर करू शकत नाहीत?” अर्चना पूरन सिंहच्या (Archana Puran Singh) या रिप्लायवर अनेकांनी रिएक्शन दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Water News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता संपली, खडकवासला धरण 82 टक्के भरले