… म्हणून मलायकाच्या प्रेमात पडला अर्जुन कपूर, पहिल्यांदाच केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाईफची चर्चाच जास्त रंगली आहे. अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोरासोबत दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. मलायका आणि अर्जुन आता अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. आता त्यांचे नाते जगापासून लपून राहिले नाही. दोघांच्या कुटुंबानेही हे नाते स्वीकारले आहे. दरम्यान मलायका व अर्जुन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहेत.

अर्जुन आणि मलायका या दोघांनीही सुरुवातील नाते लपवण्याचा बराच खटाटोप केला. पण योग्य वेळ येताच दोघांनीही नात्याची कबुली दिली. आता तर अर्जुन त्याच्या लेडी लव्हचे कौतुक करताना थकत नाही. मलायकात अर्जुनने असे काय पाहिले की, तो तिच्या प्रेमात बुडाला? असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्जुनने आता या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत अर्जुन मलायकासोबतच्या नात्यावर भाष्यं केला. अर्जुन मलायकाबद्दल भरभरून बोलला. तो म्हणाला, मलायका स्वतःच्या पायावर सन्मानजनक आयुष्य जगतेय ही तिची गोष्ट मला खूप भावते. वयाच्या 20 व्या वर्षी तिने काम सुरू केले आणि आयुष्यात पुढे जात सन्मान मिळवला. तिची हीच गोष्ट मला आवडते. तिला मी कधीच तक्रार करताना पाहिले नाही. आजुबाजूला कितीही प्रतिकूल गोष्टी घडत असल्या तरी ती कधीच तक्रार करत नाही. ती कामाबद्दल बाता मारण्याऐवजी काम संपवण्याकडे तिचा कल असतो. तिच्या विचारात मी कधीच नकारात्मकता बघितली नाही. आयुष्यात आनंदी कसे राहायचे याचाच ती सतत प्रयत्न करत असते. मी रोज तिच्याकडून नवे काही तरी शिकत असतो, असे तो म्हणाला.