अर्जुन-मलायका चे पुन्हा ‘खुल्लम खुल्ला’

मुंबई : वृत्तसंस्था – मलायका आणि अर्जुन कपूर यांचे नाते आता जगजाहीर झाले आहे. दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसून येत आहे. हे कपल पुन्हा एकदा एकत्र दिसून आले आहे. संजय कपूर यांनी दिलेल्या न्यू ईअर पार्टीत मलायका व अर्जुन दोघांनीही हातात हात घालून एन्ट्री घेतली. यावेळी मलायकाने डार्क ब्राउन कलरचा शिमर गाउन परिधान केला होता तर, अर्जुन कपूर नॉर्मल ड्रेसमध्ये होता. याआधी ख्रिसमस पार्टीतही हे दोघे एकत्र दिसून आले होते. केवळ इतकेच नाही तर एका फ्रेममध्ये अर्जुन मलायकाच्या खांद्यावर हात टाकून उभा असलेलाही दिसला आहे. फोटोंमध्ये मलायकाची अर्जुन कपूरच्या कुटुंबासोबत असलेली जवळीक दिसून येते तसेच या दोघाचे नाते कुटुंबाने मान्य केले असावे असे दिसून येत आहे.

या पार्टी मध्ये आले होते हे सेलिब्रेटी
‘हम साथ साथ हैं’ मध्ये सलमान खानच्या बहिणीचा रोल करणारी नीलम पती समीर सोनी सोबत पोहोचली. याव्यतिरिक्त फिल्म ‘मोहब्बतें’ मध्ये काम करणारी प्रीति झिंगयानीही पतीसोबत स्पॉट झाली. प्रीतिने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तसेच करन जौहर, महीप संधू, आदर जैन, चंकी पांडे असे अनेक सेलिब्रेटी दिसले.

Loading...
You might also like