Inside Photos : चर्चेत राहिलं ‘करीना-करिशमा’चा भाऊ ‘अरमान’चं लग्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचा कझिन ब्रदर अरमान जैनचं आणि अनीसा मल्होत्रा लग्न मोठ्या धामधुमीत पार पडलं. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसले. यानंतर आता त्यांचे लग्नातील काही काँडिड फोटो समोर आल्याचे दिसत आहेत जे व्हायरल होत आहेत. फोटोत आदर आणि अरमानची बाँडिंग दिसत आहे.

या लग्नात अमिताभ बच्चन, बोनी कपूर, अनन्या पांडे, शनाया कपूर पासून तर करीना कपूर, सैफ अली खानपर्यंत अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. यावेळी करिश्मा, करीना, अनिल कपूर, तारा सुतारिया असे अनेक कलाकार डान्स करताना दिसले.

View this post on Instagram

Life! #AnissaMaanGayi

A post shared by Aadar Jain (@aadarjain) on

ऋषी कपूरची तब्येत खराब असल्यानं नीतू कपूर या लग्नाला येऊ शकल्या नाहीत. कारण त्या ऋषी कपूर यांची देखभाल करण्यात व्यस्त होत्या. नीतू यांनी इंस्टाग्रामवरून दोघांनाही आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या.

समोर आलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी अरमान जैननं अनीसाला प्रपोज केलं होतं. 3 फेब्रुवारी रोजी दोघं विवाहबद्ध झाले. विवाहबद्ध झाल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

You might also like