एरंडोलच्या पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एरंडोल येथील कासोदा रस्त्यावर असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सव्वा लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पेट्रोल पंपाचे मॅनेजर हे आपल्या केबीनमध्ये असताना दुचाकीवरुन दरोडेखोर आले. त्यांनी मॅनेजरच्या कानावर पिस्तुल लावून पेट्रोल पंपावर जमा झालेले जवळपास सव्वा लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटून नेली. ही घटना समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.