बर्फाच्छादित लेहच्या सीमेवर तैनात सैनिकांना लष्कर प्रमुखांनी दिले पुरस्कार ! रेचेन ला नियंत्रण रेषेवर जाणारे पहिले लष्करप्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमधील नियंत्रण रेषेवरील रेचेन ला आणि रेझांग ला या अव्वल स्थानावर गेलेले पहिले भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ठरले आहेत़. एलएसीच्या जवळ असलेल्या या दोन ठिकाणावर यावर्षी २९ व ३० ऑगस्ट रोजी भारतीय सैन्याने एका विशेष ऑपरेशनमध्ये कब्जा केला होता. आणि तेथे जाणाºया चीन सैनिकांना रोखले होते.

सैन्याच्या प्रमुखांनी वर्षाच्या मध्याला या भागात तैनात असताना कामकाजाची भूमिका व कर्तव्य निष्ठा यासाठी अधिकारी आणि जवान यांच्यासह १२ सैनिकांना प्रशंसापत्र जाहीर केले होते. या भेटीत लष्करप्रमुखांनी ते प्रत्यक्ष सीमेवर जाऊन प्रदान केले.उणे २५ अंश सेल्सिअसच्या जवळ तापमान असलेल्या या ठिकाणी नरवणे यांनी भेट दिली.

मेजर शैतानसिंग भाटी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने रेचेन ला आणि रेझांग ला हाईटस येथे चीन सैनिकांना ठार मारले होते. १९६२ च्या युद्धानंतर हा भाग कोणाच्याही अख्यारीत नव्हता. पीपल्स लिबरेशन आर्मीने केलेल्या चुकांमुळे एप्रिल -मे या काळात भारत आणि चीनमधील संघर्ष सुरु झाल्यानंतर भारतीय सैन्याने या परिसरावर कब्जा केला होता. लष्करप्रमुख या ऑपरेशनल क्षेत्राला नियमितपणे भेट दे आहेत. या भेटीच्यावेळी जनरल नरवणे यांनी सुमारे ६० वर्षांपूर्वी युद्धात आपले प्राण देणार्‍या बलाढ्य भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.