Army Commanders Council | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह : सेना कमांडर्स परिषदेमध्‍ये संरक्षण मंत्र्यांनी वरिष्‍ठ लष्‍करी अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

नवी दिल्ली : Army Commanders Council | सेना कमांडर्सची 2023 मधील पहिली परिषद 17 एप्रिल 2023 रोजी एकत्रित स्वरूपात पार पडली. या परिषदेमध्‍ये भारतीय लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वाने विद्यमान सुरक्षा परिस्थिती, सीमेवर आणि सीमाभागातील परिस्थिती आणि आव्हाने या सर्व पैलूंवर व्यापकपणे विचारमंथन केले. सध्याच्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त परिषदेमध्‍ये संघटनात्मक पुनर्रचना, लॉजिस्टिक, प्रशासन आणि मनुष्‍यबळ व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले.परिषदेच्या तिसर्‍या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाला केलेले मार्गदर्शन होते. यावेळी “राष्ट्र उभारणीत आयएचे योगदान” या विषयावर थोडक्यात चर्चा झाली. (Army Commanders Council)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी भारतीय लष्‍कर म्हणजे अब्जाहून अधिक नागरिकांची सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी संस्था असल्याचे सांगितले. सीमेचे रक्षण करण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी लष्कराने बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. नागरी प्रशासनाला ज्या ज्यावेळी गरज असते, त्या त्यावेळी लष्‍कराकडून मदत केली जाते, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “देशातील अंतर्गत परिस्थिती स्थिर राखण्यासाठी सुरक्षा, एचएडीआर, वैद्यकीय सहाय्य या प्रत्येक क्षेत्रात लष्कराचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. राष्ट्र उभारणीत तसेच सर्वांगीण राष्ट्रीय विकासात भारतीय लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.” त्यांनी सेनेच्या कमांडर परिषदेमध्ये उपस्थित राहत आले, याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांचा ‘संरक्षण आणि सुरक्षा’ विषयक दृष्टीकोन समोर ठेवून देशाला यशस्वीपणे पुढे नेल्याबद्दल लष्कराच्या नेतृत्वाचे कौतुक केले. (Army Commanders Council)

संरक्षण मंत्री राजनाथ यांनी सध्याच्या जटिल जागतिक परिस्थितीवर आपल्या संबोधनात भर दिला. जागतिक घटनांचा प्रत्येकावर परिणाम होतो, हे सांगताना ते म्हणाले की, “संकरित ( हायब्रीड) युद्धासह अपारंपरिक आणि प्रमाणबद्ध नसलेले युद्ध आविष्कार भविष्यामध्‍ये पारंपरिक युद्धांचाही भाग असतील. तसेच सायबर, माहिती, दळणवळण, व्यापार आणि वित्त या सर्व विषयांवर संघर्षांचा अविभाज्य भाग बनणार आहे. त्यामुळेच सशस्त्र दलांना रणनीती आखताना आणि हे सर्व पैलू विचारात घ्यावे लागतील.”

उत्तर सीमेवरील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना, संरक्षण मंत्री यांनी कोणतीही आकस्मिक परिस्थिती लष्कर योग्य पद्धती हाताळू शकेल, असा पूर्ण विश्वास व्यक्त केला.तरीही शांततापूर्ण मार्गाने प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सुरू असलेली चर्चा सुरूच राहील. तोडगा काढणे आणि तणाव कमी करणे हाच उत्तम मार्ग आहे. कृतज्ञता व्यक्त करताना, त्यांनी टिप्पणी केली की, “आमच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करणार्‍या आमच्या सैन्याला सर्वोत्तम शस्त्रे, उपकरणे आणि कपडे उपलब्ध करून देणे हा आपल्या ‘संपूर्ण सरकार’चा दृष्टिकोन आहे”. संरक्षण मंत्र्यांनी सीमा रस्‍ते संघटनेच्या (बीआरओ) प्रयत्नांची प्रशंसा केली. अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत असताना पश्चिम आणि उत्तरेकडील सीमेवरील रस्ते दळणवळणात अतुलनीय सुधारणा झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा संदर्भ देत, त्यांनी सीमेपलीकडील दहशतवादाला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रतिसादाची प्रशंसा केली. तरीही शत्रूकडून छाया (छुपे) युद्ध सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा सामना करण्यासाठी सीएपीएफ/पोलीस दल आणि लष्कर यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे मंत्री राजनाथ यांनी कौतुक केले. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील समन्वयित कारवाया या प्रदेशात स्थैर्य आणि शांतता वाढवण्यास हातभार लावत आहेत आणि ते चालूच राहिले पाहिजे आणि यासाठी मी पुन्हा भारतीय लष्कराचे अभिनंदन करतो”, असेही ते म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याची उच्च दर्जाची कार्यसज्जता आणि क्षमतांबद्दल प्रशंसा केली आणि याचा अनुभव आपण प्रत्येक भेटी दरम्यान नेहमीच घेत आहे, असे ते म्हणाले. मातृभूमीच्या रक्षणासाठी पराकोटीचे बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. परकीय सैन्यांसोबत शाश्वत सहकारी संबंध निर्माण करून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांना पुढे नेण्यासाठी आपल्या लष्कराने लष्करी मुत्सद्देगिरीत केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. ‘ऑपरेशन दोस्त’ दरम्यान तुर्कस्तानमध्ये भूकंपानंतर मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमेसाठी भारतीय लष्कराने केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

संरक्षण मंत्र्यांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर भर दिला आणि सशस्त्र दलांनी नवे तंत्रज्ञान योग्यरित्या सामावून घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. प्रमुख शैक्षणिक संस्थांसह नागरी उद्योगांच्या सहकार्याने विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आणि त्याद्वारे ‘स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण’ किंवा ‘आत्म निर्भरते’ च्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत प्रगती करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. वापरकर्ता म्हणून आपण स्वत:च्या उद्योगांवर आणि तंत्रज्ञानावर आपला विश्वास ठेवला पाहिजे, जे उद्योगांना सर्वोत्तम उत्पादनासाठी प्रेरित करेल आणि आत्म निर्भरतेला चालना देईल, यावरही त्यांनी भर दिला.

भारतीय सैन्याच्या बहुतांश प्रवाहात महिला अधिकाऱ्यांना समाविष्ट करून ‘महिला सक्षमीकरण’ या राष्ट्रीय
संकल्पनेसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांसाठी कायमस्वरूपी आयोग मंजूर करणे लष्कराला पूरक ठरले,
असे संरक्षण मंत्र्यांनी सां‍गितले. त्यांनी सैन्यात नव्याने तयार केलेल्या ‘अग्निवीर’ भरती योजनेच्या
अंमलबजावणीसाठी तसेच यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी दाखविलेल्या उत्साहाचे कौतुक केले.

मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘ब्लू हेल्मेट ओडेसी- 20 व्या शतकातील शांतता मोहिमेची बदलणारी रूपरेषा’ या
शीर्षकाच्या भारतीय लष्कराच्यावतीने संयुक्त राष्‍ट्राच्या नियतकालिकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली.
यामध्‍ये वरिष्ठ लष्करी नेतृत्व आणि मुत्सद्दी त्यांच्या मोहिमा आणि दृष्टीकोनातून मिळालेल्या सामुग्रीचे संकलन आहे् ही एक स्मरणिका आहे.
भारतीय लष्कराच्या 75 वर्षांच्या निमित्ताने टपाल तिकीटाचे अनावरण करण्‍यात आले.
संरक्षण मंत्र्यांनी विशिष्ट तंत्रज्ञान, पाळत ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशिक्षण, रोबोटिक्स,
व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑपरेशनल लॉजिस्टिक इत्यादींवर लक्ष केंद्रित करणार्‍या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी केली.

“संरक्षण मुत्सद्दीपणा, स्वदेशीकरण, माहिती युद्ध, संरक्षण पायाभूत सुविधा आणि सैन्य आधुनिकीकरण या
विषयांवर अशा मंचावर नेहमी विचारमंथन व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले.
युद्धाची तयारी ही सतत घडणारी घटना असली पाहिजे आणि आपण कधीही अनपेक्षित आणि अनिश्चित घटनांसाठी
नेहमी तयार असले पाहिजे.
ज्या ज्यावेळी आवश्यक असेल त्या त्यावेळी प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आपण आपल्या लढाऊ कौशल्यांचा आणि शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान यांचा नेहमी वापर केला पाहिजे.
देशाला आपल्या लष्कराचा अभिमान आहे आणि सरकार लष्कराला त्यांच्या पुढील वाटचालीत, सुधारणा आणि क्षमता
आधुनिकीकरणाच्या मार्गावर मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.” असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

Web Title :-  Army Commanders Council | Defense Minister Rajnath Singh: Defense Minister Guides Senior Army Officers at Army Commanders’ Conference
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – वेगवेगळे बहाणे करून चारचाकींमधील बॅगा लंबाविणार्‍या परप्रांतीय टोळीला अटक, 8 गुन्हयांची उकल

Covid 19 Hospitals In Maharashtra | वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन : खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित