शहीद होण्यापूर्वी जवानाने दिले चिमुकलीला आर्मीचे धडे 

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – आर्मी म्हणजे काय ? असा शहीद अधिकाऱ्याच्या मुलीचा व्हिडिओ  सोशल  मीडियावर व्हायरल  झाला आहे. हा व्हिडिओ शहीद मेजर अक्षय गिरीश कुमार यांच्या मुलीचा आहे.

30 नोव्हेंबर 2016 ला जम्मूच्या नागरोटा भागात अक्षय गिरीश हे शहीद झाले. पोलीस वेशात येऊन दहशतवाद्यांनी सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला होता. त्यात अक्षय यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या मागे त्यांचं संपूर्ण कुटुंब एकटे पडले आहे. अक्षय गिरीश कुमार हे जरी शहीद झाले असले तरी त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांची मुलगी नैना गिरीश हिच्या लक्षात आहेत. लहानपणी अक्षय यांनी नैनाला आर्मीसंदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्याचाच हा व्हिडिओ अक्षय यांच्या पत्नी मेघना यांनी शेअर केला आहे.
त्यात नैना म्हणते की, ‘आर्मी आपल्या प्रेम करायला शिकवते, आर्मी आपल्याला  शत्रूशी लढण्यास शिकवते, आर्मी आपल्याला जय हिंद बोलायला शिकते’, असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  तुला हे कोणी शिकवलं असं जेव्हा नैनाला विचारलं, तेव्हा ‘हे मला माझ्या पप्पांनी शिकवलं’ असं नैना म्हणते.
या व्हिडिओमध्ये नैनाचा निरागसपणा खूप जवळून पाहायला मिळतो. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर नैनाचं कौतुक केलं जात आहे.