Arranged Marriage | अ‍ॅरेंज मॅरेजसाठी होकार देण्यापूर्वी आवश्य विचारा ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा करावा लागेल पश्चाताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Arranged Marriage | भारतातील बहुतांश लोक अरेंज्ड मॅरेजला प्राधान्य देतात. अरेंज्ड मॅरेजमध्ये वधू-वरांना एकत्र आणण्याचे काम दोन्ही कुटुंबांकडून केले जाते. अनेकांना हे सुरुवातीला थोडे विचित्र वाटते परंतु जसजशी बोलणी पुढे सरकते तसतशा अनेक गोष्टी समजू लागतात. (Arranged Marriage)

 

अरेंज्ड मॅरेजमध्ये चर्चा करताना मुलं-मुली सहसा फक्त कौटुंबिक आणि करिअरबद्दल बोलतात, पण अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्याकडे लक्ष दिले जात नाही. अरेंज्ड मॅरेजमध्ये जोडीदारासोबत आनंदी जीवन जगायचे असेल तर या 3 गोष्टींबद्दल आधी बोलणे गरजेचे आहे. (Arranged Marriage)

 

1. फायनान्शियल कॉम्पॅबिलिटी बद्दल बोलणे –
सध्याच्या काळात भावनांकडे जेवढे लक्ष देणे गरजेचे आहे, तितकेच पैसा आणि पैशाच्या बाबतीत समज दाखवणे गरजेचे आहे. दोघेही नोकरी करत असल्यास अरेंज्ड मॅरेजचा मुद्दा पुढे नेताना या मुद्द्यावरही मोकळेपणाने बोला.

 

जसे की लग्नानंतर तुम्ही तुमचा खर्च कसा विभागणार? तुम्ही खर्च अर्धा-अर्धा करणार की, एकाची सॅलरी खर्च करायची आणि एकाची सेव्हिंग करायची आहे. जर तुम्ही एक स्त्री असाल आणि लग्नानंतरही तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा खर्च उचलायचा असेल, तर तुमच्या भावी जोडीदाराला याविषयी अगोदरच माहिती देणे योग्य ठरेल.

 

तुम्ही नोकरी करत नसलात तरी लग्नानंतर पैशाच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे याबद्दल भावी पतीशी बोलू शकता.

2. भूतकाळाची संपूर्ण माहिती द्या –
अरेंज्ड मॅरेजमध्ये बोलणी पुढे नेण्यापूर्वी जोडीदाराला तुमच्या भूतकाळाची योग्य माहिती द्या. उदाहरणार्थ, जर तुमचा साखरपुडा मोडला असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर, या गोष्टी अगोदर उघड करणे चांगले ठरते. काही गोष्टी सांगितल्या नाही तर नंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. जी गुपिते तुम्हाला सांगायची नाहीत, ती लग्नानंतर दुसर्‍या कोणाकडून तरी कळू शकतात. अशा स्थितीत नात्यात दुरावा येऊ शकतो.

 

3. घरगुती कामावरही चर्चा महत्त्वाची –
बहुसंख्य कुटुंबात लग्नानंतर महिला घरातील जबाबदार्‍या सांभाळेल अशी अपेक्षा असते.
जसे की घरगुती कामे, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे आणि कपडे धुणे.
जर तुम्ही नोकरी करणार्‍या महिला असाल तर लग्नापूर्वी या जबाबदार्‍यांबद्दल चर्चा करणे शहाणपणाचे ठरेल.
जोडीदाराला अगोदरच सांगा की, तुम्ही कोणत्या जबाबदार्‍या घेणार आहात आणि कोणत्या नाही.

 

Web Title :- Arranged Marriage | arranged marriage 5 questions to ask before you agree things to keep in mind

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर

Diabetes & Egg | डायबिटीजच्या रुग्णांनी अंडे खावे का? जाणून घ्या तत्ज्ञांचा सल्ला

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य