अभिनेत्री अर्शी खाननं रॅम्प वॉकसाठी घातला ‘रिव्हीलिंग’ ड्रेस, धर्माच्या ठेकेदारानं केली टीका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेव्हा कधी समाजातील रूढवादी विचारांवर एखादी अदाकारा वार करते तेव्हा धर्माचे ठेकेदार लगेच तिच्या मागे पडतात. अभिनेत्री अर्शी खान हिच्यासोबतही असंच काहीसं झालं आहे. अर्शी खान कोरोना लॉकडाऊनच्या आधी एका फॅशन शोमध्ये गेली होती. यात तिनं खूपच रिव्हीलिंग ड्रेस घातला होता. यात ती खूप सुंदरही दिसत होती. परंतु अनेकांना तिची स्टाईल खटकली आहे.

अर्शीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे. यातील तिचा रिव्हीलिंग ड्रेस पाहून धर्माचे ठेकेदार तिच्यावर टीका करत व्हिडीओवर कमेंट करत आहेत. एकानं लिहिलं की, जे लोक स्वत:चं रक्षण करू शकत नाहीत ते दुसऱ्यांचं काय करणार. अल्लाह अशा लोकांपासून आणि गुन्ह्यांपासून वाचव. काय हे तोंड दाखवू शकतील… तोबा तोबा…”

अर्शीचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर वेगानं व्हायरल होत आहे. अर्शी खान कोणाच्या निशाण्यावर येण्याची तशी ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही असं अनेकदा झालं आहे. परंतु अर्शी आपल्या बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. जशी अर्शीवर काहींनी टीका केली आहे. तसंच तिची स्टाईल काहींना खूप आडवली देखील आहे. काहींनी तिच्या या हॉट लुक आणि स्टाईलचं कौतुकही केलं आहे.