तुमच्या हाडांमधून आवाज येतो का ? ‘हा’ आजाराचा संकेत असू शकतो

पोलिसनामा ऑनलाईन – हाडांच्या सांध्यातून आवाज येतो, त्यास वैद्यकीय भाषेत क्रेपिटस म्हणतात. कारण सांध्यामधील द्रवामध्ये हवेचे छोटे फुगे फुटतात, त्यांचा फुटण्यातून हा आवाज निर्माण होतो. अनेकदा सांध्याच्या बाहेरील मांसपेशीच्या टेंडन किंवा लिगामेंट्सच्या घासण्यानेही आवाज येतो.

सांध्यामध्ये हलका आवाज येणे ऑस्टियोआर्थरायटिसचा संकेत असू शकतो. ऑस्टियोआर्थरायटिस एक प्रकारचा रोग आहे, ज्यामध्ये हाडांच्या वरील भागात लवचीक ऊतींची संख्या कमी होते. गुडघ्याच्या सांध्यावरील कार्टिलेज हळुहळु नष्ट होते. नुकसानग्रस्त गुडघ्यातून करकरण्याचा आवाज अनेकदा येतो. सामान्यपणे यावेळी वेदना होत नाहीत.

जर एखाद्या मुलाच्या हाडातून कट-कट आवाज येत असेल तर घाबरण्याचे कारण नाही, कारण याचा अर्थ त्याची हाडे कमजोर आहेत किंवा शरीरात कॅल्शियम कमी आहे.

हे आहेत उपाय
1 हाडातून आवाज येण्याच्या या समस्येवर घरगुती उपाय करू शकता. रात्री अर्धा चमचा मेथीदाणे भिजवा आणि सकाळी मेथीदाणे चावून खा. त्यानंतर मेथीदाण्याचे पाणी प्या. यामुळे हाडांमधील एयर बबल्सची समस्या नष्ट होईल.

2 हाडांच्या सांध्यातील लुब्रिकंट कमी झाल्याने कटकट आवाज येतो. ही समस्या दूर करण्यासाठी कॅल्शियम पूर्ततेसाठी हळदीचे दूध सेवन करा.

3 तसेच दिवसात एकवेळा गुळ आणि भाजलेले चणे सेवन करा. हाडे मजबूत होतील.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, याचा उपचार शारीरीक व्यायाम, वजन घटवणे, औषध याद्वारे केला जातो. काही ऑस्टियोआर्थरायटिसच्या रूग्णांना हायलूरोनिक अ‍ॅसिड इंजेक्शन दिले जाते.