पाक PM इम्रान खानची भारतावर ‘अणुबॉम्ब’ टाकण्याची धमकी, काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाण्याची ‘भाषा’ !

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी आपल्या राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणात इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा विषय काढला. संबोधनाच्या सुरूवातीलाच इम्रान खान म्हणाले की आज आपण काश्मीर मुद्द्यावर बोलूयात. ते म्हणाले की आपण अशा टप्प्यावर आलो आहोत ज्यावेळी काश्मीरबाबत काय करावे हे ठरविण्याची गरज आहे.

इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावरील भारताला अणुहल्ला करण्याची पोकळ धमकी देताना सांगितले की आम्ही काश्मीर प्रकरणाचे आंतरराष्ट्रीयकरण केले असून आता काश्मिरसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक चूक असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

भारताने देशात ‘पाकिस्तान विरोधी अभियान’ राबवले :
इम्रान म्हणाले की, माझे सरकार आल्यावर माझा पहिला प्रयत्न रोजगार वाढविण्याचा होता. हवामान बदलाचा परिणाम भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर होतो. म्हणून आम्हाला सर्व शेजार्‍यांशी मैत्री करायची होती. मी म्हणालो देखील होतो की हिंदुस्थानने जर एक पाऊल उचलले तर आम्ही दोन दिशेने तुमच्याकडे येऊ. याद्वारे मी काश्मीर प्रश्न वाटाघाटीतून सुटावा असे मी भारताला सांगितले होते. पण आम्हाला अडचणी येतच राहिल्या. आम्हाला जेव्हा काश्मीरवर बोलायचे होते तेव्हा ते दहशतवादावर बोलत राहिले. यानंतर भारतात निवडणुका घेण्यात आल्या ज्यामध्ये त्यांनी ‘पाकिस्तान विरोधी अभियान’ राबवले.

दर आठवड्याला काश्मीरप्रश्नी कार्यक्रम :
संपूर्ण पाकिस्तानात काश्मीर प्रश्नी दर आठवड्याला शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये इव्हेंट करण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी १२ ते १२.३० दरम्यान लोक यासाठी रस्त्यावर उतरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अणुयुद्ध झाल्यास जगदेखील त्यास जबाबदार :
संयुक्त राष्ट्रांपासून मुस्लिम राष्ट्रांकडेही गेलो. पण त्यात यश आले नाही. आज आपल्याला कोणीच साथ देत नाही याचे खूप दुःख व्यक्त करत इम्रान खान म्हणाले की दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत, ही बाब युद्धाकडे गेली तर जगावरही परिणाम होईल. जर आपल्यात भांडण होत असेल तर जगदेखील त्यास जबाबदार आहे. २७ सप्टेंबरला पुन्हा यूएनमध्ये हा मुद्दा उचलण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आरोग्यविषयक वृत्त –