Arun Bali Passed Away | दुःखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे 79 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाईन – Arun Bali Passed Away | बॉलिवूडविश्वातून एक मोठी आणि दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे (Bollywood Actor) ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. आज पहाटे 4.30 वाजता त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. (Arun Bali Passed Away)

‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ सीरियल आणि ‘3 इडियट्स’,‘केदारनाथ’ ,‘पानीपत’ ‘मनमर्जियां’, ‘पीके’, ‘बर्फी’ सारख्या तब्बल 40 चित्रपटात भूमिका साकारून त्यांनी स्वतःचा एक चाहतावर्ग निर्माण केला होता. त्यांना Myasthenia Gravis हा दुर्मिळ आजार झाला होता.त्यांना उपचारांसाठी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अरुण बाली यांचा जन्म 23 डिसेंबर 1942 मध्ये पाकिस्तानमधील लाहोर (Lahor) या ठिकाणी झाला होता.
बाली यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.
फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे तर त्यांनी तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title :- Arun Bali Passed Away | veteran actor arun bali passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | दीड कोटीच्या फसवणुक प्रकरणात अ‍ॅड. सतीश मुळीक, अग्रजीत मुळीक, जितेंद्र भोसले, राम भुजबळ यांच्यावर FIR

Dhanushya Baan-Shivsena | निवडणूक आयोगातील धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर मोठं अपडेट, शिवसेना आणि शिंदे गटाची प्रतीक्षा वाढली

Sandeep Lamichhane | IPL खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Shivsena Chandrakant Khaire On CM Eknath Shinde | चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले – ‘आधी पक्ष फोडला आणि आता घर फोडण्याचं काम सुरुय’