अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ तर आनंद महिंद्रा, पीव्ही सिंधूला ‘पद्मभूषण’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज 25 जानेवारीला सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आज पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर आता पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर मेरी कोम हिला देखील पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

याशिवाय आनंद महिंद्रा, पीव्ही सिंधू यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

तसेच बॉलिवूडमधील कंगणा रनौत, एकता कपूर, करण जोहर, अदनान सामी, सरिता जोशी तर क्रिकेटर जहीर खान, डॉ. रमन गंगाखेडकर यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी (25 जानेवारीला) रात्री या पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. हे पुरस्कार त्या विशिष्ट लोकांना दिले जातात ज्यांनी समाज्याच्या विकासासाठी रचनात्मक किंवा असाधारण कार्य करुन एक आदर्श ठेवला आहे. तसेच त्या-त्या क्षेत्रातील दिग्गजांना देखील हे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

फेसबुक पेज लाईक करा –