’डर्टी पिक्चर’मधील ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू !, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

पोलीसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, 11 डिसेंबर : ‘डर्टी पिक्चर,’‘लव सेक्स और धोखा’ सारख्या चित्रपटांत अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आर्या बनर्जी हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक कडक केलाय. तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे, असे समजत आहे. शुक्रवारी या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

अभिनेत्री आर्या बनर्जीचा मृतदेह दक्षिण कोलकात्यातील जोधपुर पार्क येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडलाय. त्याच्या मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला आहे. देवदत्ता बनर्जी किंवा आर्या यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याच्या घरातील काम करणारी महिला त्या दिवशी कामासाठी गेली होती. मात्र, अनेकवेळा कॉल करुनही कोणीही फोन उचलला नाही.

संशयास्पद वाटत असल्याने ती महिला पोलीस ठाण्यात पोहोचली आणि त्यांना याबाबत माहिती दिली. याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आर्याचा फ्लॅट आतून बंद होता. पोलीस फ्लॅटचा दरवाजा तोडून आत शिरले. घरातील एका खोलीत आर्याचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेला होता. तिच्या नाकातून रक्त येत होतं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

‘डर्टी पिक्चर’मध्ये विद्या बालन आणि नसरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तर ’लव सेक्स और धोखा’ मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिबाकर बनर्जी यांनी केलं होतं.

आर्या बनर्जी हि सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती आपल्या चाहत्यांना नेहमी अपडेट ठेवत होती. तिच्या मृत्यूनंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरलीय. आर्या बॅनर्जीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलीय.