‘कठुआ’ प्रकरण : ‘त्या’वेळी भाजपचे मंत्री का धावले आरोपींच्या समर्थनार्थ, खा. ओवेसींचा ‘सवाल’

हैद्राबाद : वृत्तसंस्था – ‘कठुआ’ प्रकरणी एमआयएम (ऑल इंडिया मदलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) चे अध्यक्ष खासदार असरुद्दिन ओवेसी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. याप्रकरणी भाजप मंत्र्यांना टार्गेट करत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कठुआ प्रकरणी आरोपींच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीमध्ये तत्कालीन भाजप पीडीपी सरकारमधील मंत्र्यांनी सहभाग घेतल्याचा दावा ओवेसी यांनी केला. हे मंत्री या रॅलीमध्ये उपस्थित राहून आरोपींचे समर्थन का करत होते याचे उत्तर भाजपाने द्यावे असे ओवेसींनी म्हटले.

पठाणकोटमधील न्यायालयाने सोमवारी कठुआ प्रकरणातील तीन आरोपींना आजीवन कारावासाची तर तीन आरोपींना पाच पाच वर्षांच्या कारावासाची गंभीर शिक्षा सुनावली. सातपैकी एका आरोपीची मात्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली. आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने हि शिक्षा सुनावली. जानेवारी २०१८ मध्ये हि दुर्दैवी घटना घडली होती. हे प्रकरण ‘आसिफा प्रकरण’ म्हणून देशभर गाजले होते. प्रकरणी संपूर्ण देशात मोठ्या सोशल मीडियामध्ये अभियान चालवले गेले होते आणि प्रमाणावर मोर्चेदेखील निघाले होते.

न्यायालयाच्या या निर्णयप्रकरणी ओवेसींनी म्हटले आहे कि ‘अपराधी कोणत्याही धर्माचे असले तरीदेखील त्यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे शिक्षा ही झालीच पाहिजे.’

आरोग्य विषयक वृत्त – 

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी