‘कुत्रा कोण आणि सिंह कोण?’ असदुद्दीन ओवैसींचा मोहन भागवतांना प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

‘हिंदू समाजाने एकत्र यायला हवं, जर हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करून शकेल’ असं म्हणताना मोहन भागवत यांनी ‘एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्याच्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे’ असे विधान दोन दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी शिकागो येथील एका कार्यक्रमा दरम्यान केलं होते. यांच्या विधानावर संतप्त होऊन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन अोवैसीं यांनी मोहन भागवतांना सवाल केला आहे की, अखेर ‘कुत्रा कोण आणि सिंह कोण’?
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06861e9c-b426-11e8-94d1-2536bb9c6eb1′]

अोवैसी यांनी पुढे म्हटले आहे की, भारताच्या संविधानामध्ये सगळ्यांना माणूस मानलं आहे. कोणाला कुत्रा वा सिंह असे म्हटलेले नाही. आरएसएसचा संविधानावर विश्वास नाही ही त्यांची अडचण आहे. त्यानंतर मोहन भागवत यांच्या या विधानाचा समाचार घेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन अोवैसीं यांनी संतप्त होऊन ‘कुत्रा कोण आणि सिंह कोण?’ असा सवाल केला.