Asha Bhosle | ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर आशा भोसले यांनी केली कडक शब्दात नाराजी व्यक्त

पोलीसनामा ऑनलाइन – Asha Bhosle | बॉलीवुडमधील अनेक चित्रपट मागील काही दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर धडकले. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) व अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. त्यातील गाणी, ड्रेस, डायलॉग यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. चित्रपटामध्ये आलिया भट्टने नेसलेल्या दोन रंगाच्या साडीचा फॅशन ट्रेंड सध्या आला आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ (What Jhumka) हे गाणे देखील तरुणाईच्या तोंडात बसले आहे. मात्र यावर दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी टीका केली असून कडक शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. जुन्या ‘झुमका गिरा रे’ या गाण्याचा रिमेक (Jhumka Gira Re Remake) करुन हटके स्टाईलमध्ये ‘व्हॉट झुमका’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. यामधील आलियाने नेसलेली साडी आणि तिने परिधान केलेला झुमका खूप गाजत आहे. सोशल मीडियावर हे गाणे तुफान गाजत असताना आता यावर गायिका आशा भोसले यांनी प्रतिक्रिया देत नाराजी उघड केली आहे. ‘व्हॉट झुमका’ हे गाणे 1966 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा साया’ (Mera Saya) चित्रपटातील मधील ‘झुमका गिरा रे’ (Jhumka Gira Re) या सुपरहिट गाण्याचा रिमेक आहे. ‘झुमका गिरा रे’ हे अजरामर गाणे राजा मेहदी साहेब (Raja Mehdi Saheb) यांनी लिहिले असून ते आशा भोसले (Asha Bhosle) यांनी गायले होते. मात्र गाण्याचा रिमेक आशा भोसले यांना आवडला नसून त्या म्हणाल्या आहेत की आज काल निर्मात्यांना नवीन सूचत नसून ते अशा जुन्या आयकॉनिक गाण्यांचा रिमेक करत आहेत. आत्ताच्या संगीतामध्ये कोणतेही नाविन्य व क्रिएटिविटी नाही.

‘व्हॉट झुमका’ गाण्यावर दिग्गज गायिका आशा भोसले म्हणाल्या की,
“आज संगीत दिग्दर्शकांकडे आणि नवीन गायकांमध्येही ही क्षमता नाही की ते काही नवीन प्रेक्षकांना देतील.
त्यामुळेच ते जुनी गाणी रिक्रिएट करत आहेत. उदाहरणार्थ, झुमका गिरा से आज चांगले परफॉर्म करत आहे,
पण ते जुनेच गाणे आहे, जे नवीन बनवून सादर करण्यात आले आहे.” असे मत आशा भोसले (Asha Bhosle Reaction On What Jhumka) यांनी मांडले आहे. दिग्दर्शक करण जोहर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बक्कळ कमाई करत असून त्याने 19 दिवसांमध्ये 137 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI UDGAM Portal | बॅंकेमध्ये दावा न केलेली रक्कम आता एकाच वेबसाईटवर पाहता येणार; आरबीआयने केले खास पोर्टल लॉन्च

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)