नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार पद्मभूषण उदित नारायण यांना जाहीर 

 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत देण्यात येणारा यंदाचा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्धपार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांना जाहिर झाला आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावे आशा भोसले पुरस्कार दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीययोगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो.

[amazon_link asins=’B075724BVF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f408ff9b-92e0-11e8-a3bf-ad4dbe0e9713′]

भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘पुरस्काराचे यंदाचे सोळावे वर्ष असून हा पुरस्कार सुप्रसिध्द गायक पद्मभूषण उदीत नारायण यांना जाहीर होत आहे. १ लाख ११ हजार रुपयेरोख, शाल व सन्मान चिन्हअसे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उदीत नारायण यांनी ३२ भाषांत अठरा हजार गाणी गायली असून लतातदीदी बरोबर २०० गाणी तर आशातार्इंबरोबरचारशेहून अधिकगाणी गायली आहेत. यापूर्वी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषामंगेशकर, गायसक अनु मलिक, शंकर महादेवन,शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौव्हाण यांना हा पुरस्कार प्रदानकरण्यात आला आहे.

शनिवार दिनांक. ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे हा कर्यक्रम होणार आहे. यावेळी पुरस्काराचे वितरण माजीउपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार असून, जेष्ठ संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेतादत्ता साने आदी उपस्थित राहणार आहे.

यावेळी उदीत नारायण यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत ‘रजनीगंधा’ तसेच वैशाली पळसुले सादर ‘फ्युजन नृत्य’ हा कार्यक्रम रसिकांसाठीविनामुल्य सादर होणार आहे.