Asha Nadkarni Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Asha Nadkarni Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन (Asha Nadkarni Passed Away ) झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. मागील अनेक वर्षे त्या मूत्रपिंडांच्या आजाराने (Kidney Disease) त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.

मूळच्या पुण्याच्या (Pune) असलेल्या आशा नाडकर्णी 1957 मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षांपासून त्या हिंदी चित्रपटात (Hindi Movies) काम करू लागल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम (Director V. Shantaram) यांनी त्यांना आपल्या ‘मौसी’ या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाबरोबर ‘गुरू और चेला’, ‘चिराग’, ‘फरिश्ता’, ‘श्रीमानजी’, ‘दिल और मोहब्बत’, ‘अलबेला मस्ताना’ अशा अनेक विविध हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले.

दरम्यान, पन्नास ते सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt), किशोर कुमार (Kishore Kumar), आशा पारेख (Asha Parekh), शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर आशा नाडकर्णी यांनी काम केले आहे.

Web Title :  Asha Nadkarni Passed Away | veteran actress asha nadkarni passed away mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा