आषाढी वारीची तयारी पूर्ण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सायंकाळी विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पालखी रथ सजवण्याचे काम सुरु आहे. मोठ्या संख्येने आळंदीत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातून आणि इतरही राज्यातून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. त्यामुळे हा परिसर भक्तिमय झाला आहे.

[amazon_textlink asin=’B07CSN92LD’ text=’संत ज्ञानेश्‍वर’ template=’ProductLink’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d98426bf-7f5e-11e8-a134-711ec9d223b0′]

लाखो वैष्णव या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अलंकापुरीत दाखल होत आहेत. श्री संतश्रेष्ठ जगतगुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. दिवसभरात आळंदीमध्ये विविध राज्यातून दिंड्या दाखल होत आहेत. आषाढी पायीवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त आळंदीत दाखल झाल्याने संपूर्ण शहरासह पवित्र इंद्रायणीचा परिसर हरिनामाने दुमदुमून निघत आहे.