Ashish Deshmukh | आशिष देशमुखांच्या दाव्याने राजकारणात खळबळ ! मविआ बैठकीत वाटाघाटी करणारे काँग्रेसचे 2 बडे नेते भाजपात येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- Ashish Deshmukh | लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने जागावाटपासाठी घटपक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. याच दरम्यान, आज मविआची महत्वाची बैठक होत आहे, मात्र काँग्रेस नेत्यांनी या बैठकीचे जाणीवपूर्वक उशीरा निमंत्रण पाठवल्याचा आरोप वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केला असतानाच आता भाजपा नेते आशिष देशमुख यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Ashish Deshmukh)

भाजप नेते आशिष देशमुख यांनी म्हटले की, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटीच्या बैठकीत तीनही पक्षाचे नेते सहभागी होत आहेत. त्यात महत्त्वाच्या नेत्यांपैकी दोन नेत्यांची भाजपशी पूर्ण बोलणी झाली आहे. लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करतील. काही दिवसातच त्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त कळेल.

आशिष देशमुख म्हणाले, विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक नेते भाजपामध्ये येण्यास इच्छुक आहेत. काँग्रेस नेते उल्हास पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मोदींच्या नेतृत्वात देशाला जगतगुरू करण्यासाठी अनेक नेते भाजपात येणार आहेत. आम्ही त्या सर्वांचे स्वागत करतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके ! 40 पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक, गृहरक्षक व नागरी संरक्षणासाठी सात पदक तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ पदके जाहीर

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, रिक्षासह तीन दुचाकी जप्त

भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Police MPDA Action | जनता वसाहत मधील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 96 वी कारवाई

देहूरोड येथे साडे 11 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक