Ashish Shelar | उद्धव ठाकरेंनी लाल बावटा आणि साम्यवाद्यांसोबत जाऊन वैचारीक लोच्या केला आहे – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर जी काही कारणे सांगितली त्यातील एक मुख्य कारण म्हणजे शिवसेनेची (Shivsena) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) युती हे होते. त्यामुळे आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणार्थ बंडाचा ध्वज हाती घेतल्याचे शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचे मत आहे. त्यावरुन भाजप (BJP) देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत आहे. भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी औरंगजेब बादशहाचा (Mughal Emperor Aurangzeb) उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना प्रश्न टाकला आहे. महाराष्ट्रावर कब्जा करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे का, असा प्रश्न आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरेंचा वैचारीक लोच्या झाला आहे. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षांसोबत संधान बांधून वैचारीक लोच्या तर केलाच आहे. पण, आता ते पोटनिवडणुकीत (Andheri By Election) लाल बावटा आणि साम्यवाद्यांकडून (Communist Party of India) समर्थन देखील मागत आहेत. मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) त्यांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे ते आता समाजात विभागण्या करत आहेत. धर्म जात यांची पेरणी करत आहेत, असे शेलार यावेळी म्हणाले.

यावेळी सामना वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या मराठी मुस्लिम या शब्दांवर शेलारांनी आक्षेप घेतला. (दि. 22 ऑक्टोबर) रोजी सामना वर्तमानपत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाला मराठी मुस्लिमांचे समर्थन आहे, अशी बातमी होती. त्यावर शेलार म्हणाले, समर्थन कुणी कुणाला द्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यातून राजकीय स्वार्थासाठी मतांची पेरणी करण्याचा नवा विचार ठाकरे गटाने मांडला आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी केलेली ही राजकीय पेरणी आहे. तुम्ही मराठी मुस्लीमांची मांडणी करत आहात, तर मग मराठी जैन, मराठी गुजराती यांच्या बरोबर तुमचे वैर आहे का? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत?, असे शेलार म्हणाले.

महाराष्ट्रावर आणि दख्खनवर कब्जा करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न होते. पण ते पूर्ण होऊ शकले नाही.
याच महाराष्ट्रात तो मृत्युमुखी पडला. आता त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न उद्धव ठाकरे पूर्ण करत आहेत,
असे विधान आशिष शेलारांनी यावेळी केले.

Advt.

Web Title :-  Ashish Shelar | bjp mla mumbai president ashish shelar slams uddhav thackeray shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Bharti 2022 | नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती स्थगित, पुढील आठवड्यात निर्णय

Aditya Thackeray | टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरे आक्रमक, एकनाथ शिंदेंवर केला आरोप, म्हणाले – ‘एका माणसाच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र…’