Birthday SPL : अभिनेते अशोक सराफ यांचा मुलगा अभिनयात नव्हे तर ‘या’ कलेत पारगंत ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आपल्या अभिनयानं चाहत्यांना खळखळून हसवणारे अभिनेते अशोक सराफ आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत वयाची सत्तरी पार केलेले अशोक सराफ आजही तितकेच उत्साही आहेत. खऱ्या आयुष्यात ते खूप शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी अभिनेत्री निवेदिता जोशीसोबत लग्न केलं आहे. अशोक सराफ यांना मराठी सिनेमातील सुपरस्टार म्हटलं जातं. अनेकांना त्यांचा मुलगा अनिकेत याच्या बद्दल काहीच माहिती नाही. त्याच्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

https://www.instagram.com/p/B59LE0vBDb3/

अनेक सुपरस्टारची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत फिल्म इंडस्ट्रीत करिअर करताना दिसत आहेत. अनेकांनी आपली ओळखही तयारही केली आहे. अशात अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत याच्याबद्दल बोलायचं झालं तर त्याला सिनेमात अजिबात रस नाही. त्याला जेवण बनवायला खूप आवडतं.

https://www.instagram.com/p/B6zkMgGpdkr/

अनिकेत चांगला शेफ आहे. तो पाश्चिमात्य पद्धतीचं जेवण खूप चांगलं बनवतो. युट्युबला निक सराफ नावानं त्यानं त्याचे अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत. अनिकेत त्याच्या आई-वडिलांसोबत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतो.

https://www.instagram.com/p/B6DeqB1lzXy/

अशोक यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मराठी सिनेमा, मालिकांसह बॉलिवूडमध्येदेखील त्यांनी आपली ओळख तयार केली आहे. त्यांनी आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी, अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. हम पाच या मालिकेतील त्यांची आनंद माथुरची भूमिकाही खूप फेमस आहे.