माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण २१ हजार मतांनी पिछाडीवर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण २१ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेतही कॉंग्रेसला नांदेडची जागा राखली होती. पंरतु यावेळी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या पराभवासाठी भाजपने मोठी ताकत लावली आहे.

नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांनी सध्या मुसंडी मारलेली दिसते आहे. राज्यात कॉंग्रेसला एक्झीट पोलमध्ये ६ जागा मिळतील असे सांगितले आहे. २०१४ मध्ये अशोक चव्हाणांनी मोदी लाटेत आपली जागा राखली होती. ते सध्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

त्यामुळे भाजप शिवसेना युतीने आपली ताकत येथे मोठ्या प्रमाणात लावली होती. त्यामुळे अशोक चव्हाणांना मोठा धक्का येथे बसू शकतो. नांदेडमध्ये एकूण ११ लाख मतदान झाले आहे. सध्या राज्यात प्रदेशाध्यक्षांसह कॉंग्रेस पिछाडीवर आहे. तर भाजप सध्या २४ जागांवर तर शिवसेना २० जागांवर आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस सर्वच जागांवर पिछाडीवर आहे.