ASI Bhaskar Modve Passed Away | तपासासाठी गेलेल्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर (ASI) काळाचा घाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ASI Bhaskar Modve Passed Away | गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर माणिक मोडवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. भास्कर मोडवे हे तपासासाठी सोलापूर येथे गेले होते. काम झाल्यानंतर ते पुण्याकडे येत असताना प्रवासादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. मोडवे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे पोलीस (Pune Police) दलासह त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

 

भास्कर मोडवे हे खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासासाठी (Investigation) ते सोलापूर (Solapur) येथे गेले होते. सोलापूर येथील काम संपवून पुण्याकडे येत असताना त्यांचे निधन झाले. ( ASI Bhaskar Modve Passed Away)

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्यासह अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे (DCP Dr. Priyanka Narnaware), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Srihari Bahirat) यांनी मोडवे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

 

Web Title : – ASI Bhaskar Modve Passed Away

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा