Tata Group | टाटाच्या ‘या’ स्टॉकद्वारे होईल बंपर कमाई ! एक्सपर्टने 540 रुपयांच्या टार्गेट प्राईससह दिले Buy रेटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group | कंपन्यांचे तिमाही निकाल येत आहेत. आर्थिक वर्ष 2023 ची पहिली तिमाही टाटा मोटर्स (Tata Motors) साठी चांगली ठरलेली नाही. असे असूनही या शेअरवर डाव लावणारे गुंतवणूकदार येत्या काळात मालामाल होतील, असा विश्वास जाणकारांना आहे. ब्रोकरेजने टाटाच्या या शेअरला ’बाय टॅग’ (Buy Tag) दिला आहे. मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी टाटा मोटर्सचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ तोटा वाढून 4,951 कोटी रुपये झाला आहे. (Tata Group)

 

540 रुपयांपर्यंत जाईल टाटाचा शेअर !

ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, या शेअरची किंमत येत्या काळात 540 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकते. दुसर्‍या तिमाहीत कामगिरी चांगली होईल, असा विश्वास कंपनीला आहे. या विश्वासामागे स्पोर्ट्स सेगमेंटकडून मिळालेली ऑर्डर आहे. त्याच वेळी, आणखी एक ब्रोकरेज फर्म EmKay ने देखील टाटाच्या या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. एमकेने 530 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

 

शेअर बाजारात टाटा मोटर्सची या वर्षी कशी आहे कामगिरी ?

एनएसईवर गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 6.39% वाढ झाली आहे. यादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत 417 रुपयांवरून 437 रुपयांपर्यंत वाढली आहे. 2022 च्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, या काळात टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 10.82% नी घसरली आहे. (Tata Group)

 

तिमाही निकालाने धक्का !

बुधवारी एप्रिल – जून तिमाहीच्या निकालांबद्दल स्टॉक एक्स्चेंजला माहिती देताना कंपनीने सांगितले की, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत तिचा तोटा 4,450 कोटी रुपये होता.
या कालावधीत टाटा मोटर्सचे एकत्रित परिचालन उत्पन्न वाढून रु. 71,935 कोटी झाले.
मागील वर्षीच्या याच कालावधीत तो 66,406 कोटी रुपये होता.
एकल आधारावर, टाटा मोटर्सने पहिल्या तिमाहीत रु. 181 कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला, गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा चांगली कामगिरी दाखवली.
एप्रिल – जून 2021 या तिमाहीसाठी, कंपनीचा स्वतंत्र आधारावर तोटा 1,321 कोटी रुपये होता.

 

Web Title : – Tata Group | tata motars may surges 540 rupees lavel expert give buy rating

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा