Asia Cup 2023 | आशिया चषकासाठी भारत-पाकिस्तानचा एकाच गटात समावेश; जय शाह यांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Asia Cup 2023 | बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023-24 मधील क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आगामी पुरूष आशिया चषकाच्या स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. आशिया चषकात एकूण 13 साखळी सामने होणार असून त्यामधील 4 संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. सप्टेंबर 2023 मध्ये हि स्पर्धा पार पडणार आहे.

स्पर्धेच्या ठिकाणावरून वाद
या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. मात्र, स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे या आधीच स्पष्ट केले होते. तसेच ही स्पर्धा एखाद्या तटस्थ ठिकाणी आयोजित करावी अशी मागणी देखील बीसीसीआयने आशियाई संघटनेकडे केली होती. (Asia Cup 2023)

यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयविरूद्ध आक्रमक पवित्रा घेत टीका केली.
पीसीबीने लांबलचक पत्रक काढून भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकू अशी धमकीदेखील दिली होती.
मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये बदल करण्यात आला असून पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांची
अध्यक्षपदावरून हकालपट्टी करून नजम सेठी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आशिया चषकासाठी संघ
गट अ – भारत, पाकिस्तान, क्वालिफायर 1.
गट ब – बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका

Web Title :- Asia Cup 2023 | india pakistan are in the same group for the asia cup 2023 says that acc president jay shah

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया