आजपासून आशिया चषकाचा रणसंग्राम 

दुबई:
आशिया खंडातील महत्वाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ‘आशिया कप’ क्रिकेट स्पर्धेचा धमाका आजपासून दुबईत पाहायला मिळणार आहे. आज बांगलादेश आणि श्रीलंका सलामीला खेळणार आहेत.आशिया चषकांत सहा संघाचा सहभाग असला तरी भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेमध्ये कर्णधार विराट कोहली संघात सहभागी झालेला नाही.
भारताचा सलामीचा सामना १८ सप्टेंबर रोजी हाँगहाँग संघाशी होणार असून दुसऱ्याच  दिवशी भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडेल.तब्बल १५ महिन्यानंतर आमने-सामने उभे ठाकणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये १९ तारखेला खेळल्या जाणाऱ्या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
संघ विभागणी
सहा संघांना दोन गटांत विभागले असून अ गटात हिंदुस्थानसह पाकिस्तान आणि हाँगकाँग संघांचा समावेश करण्यात आला आहे, तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक
१५ सप्टेंबर – बांगलादेश वि. श्रीलंका
१६ सप्टेंबर – पाकिस्तान वि. हाँगकाँग
१७ सप्टेंबर – श्रीलंका वि. अफगाणिस्तान
१८ सप्टेंबर – हिंदुस्थान वि. हाँगकाँग
१९ सप्टेंबर – हिंदुस्थान वि. पाकिस्तान
२० सप्टेंबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान
बेस्ट ऑफ फोर लढत  – २१ ते २६ सप्टेंबर
अंतिम फेरी – २८ सप्टेंबर
[amazon_link asins=’B074G3TJYF,B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’103678c9-b8ca-11e8-9dd9-fb6c3bf4d3fa’]