पाकिस्तानमध्ये वेगाने वाढू लागलाय कोरोनाचा ‘ग्राफ’; इस्लामाबादमध्ये लावला Lockdown

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या घटनांमध्ये पुनरुत्थान होत आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन लावले आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले आणि याचे प्रमाण ११% वर पोहचल्यानंतर अधिकाऱ्यांनी राजधानी इस्लामाबाद आणि देशातील अन्य अतिसंवेदनशील भागांमध्ये सोमवारी आंशिक लॉकडाऊन लावला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आजची परिस्थिती गेल्या वर्षीच्या परिस्थितीपेक्षा वाईट आहे. अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरस संक्रमणाला रोखण्यासाठी सोमवारी पूर्व पंजाब प्रांताच्या अतिसंवेदनशील भागात १ एप्रिलपासून २ आठवड्यांसाठी आंशिक लॉकडाऊन लावण्याचे जाहीर केले.

पाकिस्तान सरकार अर्थव्यवस्थेला घेऊन वाईट परिस्थितीतून जात आहे आणि नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी आतापर्यंत राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लावण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमित ४,५२५ नवीन रुग्ण आहेत, ज्यामध्ये ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे एकूण ६,५९,११६ केसेस नोंदवले गेले आहेत. या महामारीमुळे १४,२५६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

थोड्या दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संक्रमित असताना त्यांनी आपल्या मीडिया टीमसमोर बैठक घेतली. ही वार्ता समोर आल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहेत. विरोधी पक्ष सतत त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यानंतर ते आवामच्या निशाण्यावर आले आहेत. गेल्या शनिवारी इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा खान यांचा कोविड रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता.