टेनिसपटू अंकिता रैनाला कांस्यपदक

जकार्ता :

आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने महिला एकेरीत कांस्य पदक जिंकले आहे. प्रतिस्पर्धी चीनची खेळाडू शुआई जैंग हिने अंकिता रैनाचा ४-६, ६-७ अशा सेटमध्ये पराभव केला. यामुळे रैनाला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले.
[amazon_link asins=’B07335K95J,B00B24DKFK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’784169ba-a6be-11e8-91a0-65acce26622e’]

तर दुसरीकडे टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे. अटीतटीच्या लढतीत बोपण्णा-शरण जोडीने जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ६-३, १०-८ अशी मात केली. या विजयामुळे भारताच्या खात्यात किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे. याव्यतिरीक्त बॅडमिंटनमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे.
या कांस्यपदकासह भारताच्या खात्यात आतापर्यंत ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ९ कांस्य पदक जमा झाले आहेत.