माणुसकी ! कोरोना काळात आईला गमावणार्‍या नवजात बाळांसाठी पुढे आली महिला, स्तनपान देण्याची व्यक्त केली इच्छा

आसाम : वृत्त संस्था – देशात सध्या कारोनाची स्थिती अतिशय खराब आहे. प्रत्येकजण त्रस्त आहे. अनेक रूग्ण असे आहेत, ज्यांना उपचार सुद्धा मिळत नाहीत. अशावेळी अनेक लोक इतरांसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. मुंबईची एक सेलिब्रिटी आणि प्रॉडक्शन मॅनेजर रोणिता कृष्णा शर्मा रेखी ने सुद्धा कोरोनाने त्रस्त लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने म्हटले की, ती त्या नवजात बाळांना स्तनपान करणार आहे, ज्यांनी आपल्या आईला कोरोनामुळे गमावले आहे किंवा ज्यांची आई कोरोना संक्रमित असल्याने आयसोलेट आहे.

दोन महिन्यांच्या एका मुलीची आई असलेल्या रोणिता कृष्णाने स्वच्छेने गुवाहाटीत शहरातील अशा नवजात बाळांना स्तनपान करण्याचे ठरवले आहे. या कामासाठी इतर स्तनदा मातांनीही पुढे यावे अशी विनंती तिने केली आहे.

रोणिता कृष्णा शर्मा रेखीने 4 मे रोजी ट्विट केले की, ती मदत केवळ गुवाहाटीमध्ये करू शकते कारण ती तिथेच राहते. जर एखाद्या नवजात बाळाला आईच्या दुधाची आवश्यकता असेल तर ती त्यांना मदत करेल.

रोणिताने सांगितले की, अजूनपर्यंत कोणतीही विनंती आलेली नाही, परंतु ती आपला संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवत आहे. 10 मार्चला जन्म झालेल्या आपल्या मुलीच्या जन्मासाठी ती गुवाहाटीत आली आहे आणि यावेळी ती लोकांना मदत करू शकते.

या निर्णयामागील प्रेरणासंबंधी रोणिताने सांगितले की, तिने दिल्लीतील एका महिलेचे सोशल मीडियावरील आईच्या दुधासाठी अपील पाहिले होते. जी कोविड संक्रमित झाल्यानंतर आयसोलेशनमध्ये होती. ती म्हणते, यातून तिला वाटले की, गुवाहटीमध्ये सुद्धा अशी गरज कुणालाही भासू शकते.