पितृपक्षात ‘श्राध्द’ का घालतात, ‘तर्पण’ का करतात ? जाणून घ्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा म्हणजेच आजपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. आजपासून 28 सप्टेंबरपर्यंत हा पितृपंधरवडा राहणार आहे. आज अगस्त ऋषी आणि विविध देवतांची पूजा केली जाते. या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घातले जाते. वडील, आजोबा व पणजोबा या तीन पिढ्यातील व्यक्तींचे श्राद्ध घातले जाते. त्यांच्या नावाने पिंडदान करून त्यांना नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे.
पुराणांमध्ये दिलेल्या माहितीनुसार,पित्र कुटुंबाजवळ येतात आणि अन्न, पाणी आणि सन्मानाची अपेक्षा करतात. त्यामुळे पितृ पंधरवड्यात आपल्या पित्रांना खायला घालण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती आपल्या आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवत नाहीत तसेच मान सन्मान देत नाहीत त्यांची पित्रे पृथ्वीवरून उपाशीपोटी जातात. त्यामुळे त्यांना भविष्यात पितृदोष लागतो. त्यामुळे घरातील व्यक्तींना विविध विकार जडतात असे म्हटले जाते.

पितृपक्षाचे नियम
या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपल्या पित्रांना नैवैद्य दाखवून त्यांचे श्राद्ध घेतले जाते. तसेच ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे हाच श्राद्धाचा मुख्य नियम आहे. त्याचबरोबर ज्या दिवशीची तिथी असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांचे श्राद्ध घालायचे असते. त्याचबरोबर ज्या तिथीचा वेळ अधिक आहे त्या तिथीला श्राद्ध घालण्याचा नियम आहे.

आरोग्यविषयक वृत्त –