ज्योतिष : तुमच्या दुर्भाग्याला ‘हे’ 3 ‘ग्रह’ जबाबदार, ‘हा’ आहे परिणामकारक ‘उपाय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचे कोणतेही काम पार पडत नसेल किंवा कोणत्याही कामात सतत अडचणी येत असतील, दुर्भाग्य तुमच्या पाचवीला पूजलेले असेल तर ज्योतिष अनुसार याचे कारण मंगळ, बुध आणि राहू असू शकतात. त्यांचे तुमच्या कुंडलीत असणे अशुभ ठरु शकते.

कुंडलीमध्ये जर हे तीन ग्रह अशुभ स्थानी असतील तर व्यक्तीला मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. तसेच निर्णय चूकू शकतात आणि समस्या वाढू शकतात.

हे तीन ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये असल्याने वाद, कौटूंबिक मतभेद सुरु होऊ शकतात. यासाठी ज्योतिषमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यात एक उपाय सर्वात परिणामकारक आहे.

काय आहे उपाय
घराच्या बाहेर एक निवडूंगाचे झाड लावा. रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही त्याला पाणी घाला. असे रोज ४० दिवस करा. यानंतर ४१ व्या दिवशी कुंडी एखाद्या दूरच्या ठिकाणी ठेवून या.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like