जगातील पहिला ‘ड्युअल स्क्रीन’ लॅपटॉप लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील पहिला ‘ड्युअल स्क्रीन’ असलेल्या लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे. कंप्यूटेक्ट २०१९’ परिषदेत हा लॅपटॉप सादर केला. आसूस झेनबुक प्रो ड्युओ’ (Asus ZenBook Pro Duo) असे या लॅपटॉपचे नाव आहे. लॅपटॉपमध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन कीबोर्डसोबतच्या एरियामध्ये देण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये ॲलेक्सा व्हॉइस सपोर्टचं फीचर आहे. भारतामध्ये हा लॅपटॉप सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

लॅपटॉपची वैशिष्ट्ये –

दुसऱ्या स्क्रीनला की-बोर्ड एवढी जागा देण्यात आली आहे.

की-बोर्डच्या अगदी वरती दुसरी स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन मुख्य स्क्रीनच्या एक्सटेंडेड डिस्प्लेप्रमाणे काम करते.

या लॅपटॉपमध्ये १५. ६ इंचाची 4K UHD OLED HDR सपोर्टिंग टच स्क्रीन देण्यात आली आहे. युजर्स कोणतीही विंडो दुसऱ्या स्क्रीनवर ड्रॅग करू शकतात.

लॅपटॉपमध्ये नंबर पॅड डायल फंक्शन देण्यात आले आहे. ड्युअल स्क्रीन लॅपटॉपच्या की बोर्डमध्ये पाम रेस्ट असणार आहे. यामुळे टायपिंग करण्यात अडचण जाणवणार नाही.

लॅपटॉपच वजन २. ५ किलोग्राम आहे.

या लॅपटॉपमध्ये अलेक्सा व्हॉईस सपोर्ट आहे.

लॅपटॉपमध्ये ३२ जीबी डीडीआर ४ रॅम आहे. लॅपटॉपमध्ये कोणताही एसडी कार्ड सपोर्ट नाही.