स्मार्टफोनसारखे फीचर असणारा जगातला पहिला स्लीम लॅपटॉप लाँच

लास वेगास : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ग्राहक प्रदर्शन शो (CES) 2019 ला आजपासून सुरूवात झाली. यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभरातील अग्रगण्य कंपन्या सहभागी होत असून आपआपले नवनवे प्रोडक्ट्स सादर करत आहेत. तायवानची प्रख्यात कंपनी आसुसनेही आपला ZenBook S13 हा लॅपटॉप लाँच केला आहे. यामध्ये स्मार्टफोनसारखे फिचर्स देण्यात आले असून तो जगातील पहिला नॉच डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे.
असा आहे नॉच डिस्प्लेचा लॅपटॉप
या लॅपटॉपचे वजन 1.13 किलोग्रॅम इतके आहे. तसेच 13.9 इंचाचा फुल एचडी एलईडी डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमधून ग्राहकांना 97 टक्के डिस्प्ले मिळणार  या लॅपटॉपची बॉर्डर खूप कमी असून हा जगातील पहिला सर्वात स्लीम लॅपटॉप आहे, असा आसुस कंपनीचा दावा आहे.

अन्य फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये एनविडियाचा जेनफोर्स MX150 ग्राफिक्स आणि इंटेलचा 8 वा जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. या लॅपटॉपमध्ये कंपनीनं कॅमेरा डिस्प्लेही वरच्या बाजूस दिला आहे. याशिवाय लॅपटॉपमध्ये 16 जीबी रॅम आणि 1 टीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याचा पर्याय आहे. मात्र, या लॅपटॉपची किंमत किती असणार आहे, याबाबत कंपनीनं अद्याप स्पष्ट केले नाही.

आसुस झेनबुक एस 13 ची विक्री जानेवारी 2019 ते मार्च 2019 पर्यंत सुरू राहणार आहे.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like