अकोल्यात रचला जाणार पोहे बनवण्याचा विश्वविक्रम ? 

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. पोहे हा पदार्थ तर महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक घरात बनतोच बनतो. आता आकोल्यात तब्बल एकाच कढईत एक हजार किलो पोहे बनवण्याचा विक्रम करण्यात आला आहे. अकोल्यातील पत्रकार नीरज आवंडेकर यांनी हा उपक्रम केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विश्वविक्रमाचा दावा करण्यात येणार असल्याचे आवंडेकर यांनी सांगितले आहे.

अकोला शहरातील शास्त्री मैदानावर सुरु असलेल्या मोर्णा सांस्कृतिक महोत्सावात हे पोहे बनविण्यात आले. या पोह्यांचं वाटप अकोलेकरांसह सकाळी चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. आज अकोल्याचा पारा ५.९ अंशांवर होता. मात्र हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीतही अकोलेकरांनी पोह्यांचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील शास्त्री स्टेडियमवर गर्दी केली होती.

मैदानावर दहा बाय दहाच्या भल्या मोठ्या कढईत हे पोहे बनविण्यात आलेत. या उपक्रमासाठी निरज आवंडेकर यांनी कालपासूनच तयारी सुरू केली होती. आतापर्यंत पोहे बनविण्यासंदर्भात कोणत्याच विक्रमाची नोंद नसल्याचं आयोजकांचा दावा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ते विश्वविक्रमाचा दावा लिम्का बुकसह गिनिज बुककडे करणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like