Atal Pension Yojana (APY) | फक्त 7 रुपायांची करा बचत अन् सुनिश्चित करा 5 हजार रुपयाची पेन्शन; 71 लाख लोकांनी घेतला लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojana (APY) | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) अनेक लाभदायक योजना आणत असते. त्यामधील अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana (APY) अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून जादा ग्राहक या योजनेमध्ये जोडले आहेत. दरम्यान, या योजनेचा लाभ वर्षांपूर्वी अर्थात 2016-17 या आर्थिक वर्षात फक्त 23.99 लाख नागरीकांनी घेतला होता. तर या योजनेबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

21 जानेवारी 2022 पर्यंत अटल पेन्शन योजनेंतर्गत 71 लाख 06 हजार 743 सदस्य जोडले गेले असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. बी. के. कराड (Dr. B. K. Karad) यांनी राज्यसभेत सांगितली आहे. महामारी दरम्यान, अटल पेन्शन योजनेंमध्ये सामील होणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात या योजनेत 79 लाखांहून जादा ग्राहक जोडले गेले, तर चालू आर्थिक वर्षात 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून जादा ग्राहक त्यात जोडले गेले आहेत. अशी माहिती पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने जारी केलेल्या आकडेवारीनूसार समोर आलीय. Atal Pension Yojana (APY)

 

दरम्यान, गुंतवणुकीची रक्कम ग्राहकांच्या वयावर अवलंबून असते, समजा तुम्ही तरुण वयात योजनेत भाग घेतल्यास,
तुम्ही अल्प रकमेमध्ये 5000 रुपयांपर्यंत पेन्शन सुनिश्चित करू शकता.
जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेचा भाग घेतला तर दररोज फक्त 7 रुपये वाचवून तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी 5000 रुपये पेन्शन सुनिश्चित करू शकता.
40 वर्ष वय असताना अटल पेन्शन योजनेंतर्गत दररोज किमान 145.40 रुपये वाचवावे लागतील आणि
जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेचा भाग झाला तर तुम्हाला 42 वर्षांत 105840 रुपये (210 रुपये प्रति महिना) योगदान द्यावे लागणार आहे.
40 वर्षे वयाच्या योजनेत 348960 रुपये (1454) मासिक योगदान द्यावे लागणार आहे.

 

 

– मे 2015 योजना सुरु झाली होती

– ही योजना 9 मे 2015 रोजी गरीब, समाजातील निम्न घटक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसह सर्व भारतीयांसाठी १ सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली म्हणून सुरू करण्यात आली आहे.

– ही योजना 1 जून 2015 पासून कार्यरत आहे आणि PFRD च्या माध्यमातून प्रशासित आहे.

– या योजनेअंतर्गत, 18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात.

– ज्यांचे बचत खाते कोणत्याही बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे.

– या योजनेअंतर्गत 5 पेन्शन स्लॅब आहेत – 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि 5000 रुपये.
जेव्हा ग्राहक 60 वर्षांचा होतो, तेव्हा सरकार त्याला निवडलेल्या पेन्शन स्लॅब नुसार पेन्शन देते.
ग्राहकांच्या मृत्यूनंतर, नामांकित व्यक्तींना पेन्शन दिली जातेय.

– या योजनेत तुम्हाला कमीत कमी 20 वर्षे गुंतवणूक करावी लागणार आहे.

 

Web Title :- Atal Pension Yojana (APY) | atal pension yojana save just rs 7 and get a pension of rs 5000 benefiting 71 lakh people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा