Atal Pension Yojana | अटल पेंशन सरकारी योजना रिटायरमेंटनंतर देऊ शकते दरमहा हजारो रुपये

पोलीसनामा ऑनलाइन – Atal Pension Yojana | प्रत्येक जण चांगला परतावा देणाऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या शोधामध्ये असतो. यामध्ये नोकदार वर्ग देखील चांगला फायदा देणाऱ्या रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan) शोधत असतो. नोकरदार वर्गाचे भविष्य आणि खासकरून वृध्दापकाळ कोणत्याही वित्तीय अडचणी शिवाय जावा यासाठी नोकरी करत असतानाच चांगल्या रिटायरमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे हे कधीही फायदेशीर ठरत असते. अशावेळी जर सरकारी रिटायरमेंट प्लॅन (Government Retirement Plan) मध्ये गुंतवणूक केली तर याचा अधिक चांगला फायदा तर मिळतोच आणि इन्व्हेस्टमेंट देखील सुरक्षित राहते. देशातील नोकरदार लोकांची संख्या आणि त्यांची गरज लक्षात घेऊन भारत सरकारतर्फे APY ही रिटायरमेंट स्कीम (APY Retirement Scheme) लॉन्च करण्यात आली आहे. APY अर्थात अटल पेंशन योजना (Atal Pension Yojana) सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा हा फायदेशीर आणि सुरक्षित पर्याय आहे.

सध्या बाजारामध्ये अगणित रिटायरमेंट स्कीम उपलब्ध आहेत. मात्र सरकारी रिटर्न आणि इंव्हेस्टमेंटची ग्वाही देणारी ही सरकारी योजना खास आहे. ‘अटल पेंशन योजना’ हिची नोकरदार वर्गामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. याचा योजनेमध्ये गॅंरेटीने पेंशन मिळते. महिन्याला पगार मिळणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे या उद्देशाने 2015-16 साली ही योजना सुरु करण्यात आली. सध्या ही देशातील सर्वात्तम आणि लोकप्रिय पेंशन योजना बनली आहे. यामध्ये नोकरी करत असताना गुंतवणूक केल्यामुळे निवृत्तीनंतर नियमित खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते.

‘अटल पेंशन योजने’मध्ये वयवर्षे 18 ते वयवर्षे 40 मधील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करु शकते. नोकरी करत असताना अगदी लहान गुंतवणूक केली तरी देखील रिटायमेंट नंतर महिन्याला 1 हजार ते 5 हजार रुपये पेंशन मिळू शकते. निवृत्तीनंतर दरमहा 5,000 रुपये पेंशन मिळविण्यासाठी तुम्हाला APY योजनेमध्ये दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील. या अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही नियमांची (Atal Pension Yojana Rules) पूर्तता करणे गरजेचे आहे. यासाठी गुंतवणूक करणारी व्यक्ती ही भारतीय असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याचे वय 18 ते 40 दरम्यान असणे बंधनकारक आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्ड आणि बॅंक अकाऊंट असणे गरजेचे आहे.

हे बॅंक अकाऊंट आधार कार्डने (Aadhar Card) लिंक असावे. तसेच त्याचा मोबाईल क्रमांक देखील गरजेचा आहे.
गुंतवणूकदाराने आधी अटल पेंशन योजनेचा लाभ घेतलेला नसणे देखील महत्त्वाचे आहे.
या गुंतवणूकीमध्ये किमान 20 वर्षे पैसे भरणे महत्त्वाचे आहे.
या योजनेमध्ये सरकारने एक महत्त्वपूर्ण बदल देखील केला आहे.
जे लोक आयकर भरणारे करदाते आहेत अशा लोकांना या स्कीमचा फायदा घेता येणार नाही.
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या नियमाचे पालन करण्यात येत आहे.
देशातील अनेक लोकांनी अटल पेंशन योजनेमध्ये (Atal Pension Yojana) गुंतवणूक केली असून या
सरकारी योजनेचा फायदा घेतला आहे. आतापर्यंत 5 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Loan Processing Fees | ‘या’ बॅंकेने केली लोन प्रोसेसिंग फी माफ; कर्जदारांना होणार फायदा