Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेतून मिळवू शकता ५००० रुपये महिना पेन्शन, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : Atal Pension Yojana | निवृत्तीनंतरच्या जीवनाची सर्वांनाच चिंता असते. निवृत्तीनंतरही उत्पन्न सुरू राहिल्यास त्याचा खूप उपयोग होतो. सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेऊया जिथे दरमहा पेन्शन (Pension) मिळेल (Atal Pension Yojana Benefit).

अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana (APY) ही सरकारची एक अशी योजना आहे ज्यामध्ये निवृत्तीनंतर पेन्शन मिळत राहते. या योजनेत दरमहा २१० रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर ५,००० रुपये पेन्शन मिळेल. या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा मिळतो. योजनेत २१० रुपये इतकी किमान गुंतवणूक करू शकता.

अटल पेन्शन योजनेबद्दल
ही योजना ९ मे २०१५ रोजी सुरू करण्यात आली. यंदा या योजनेला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाच्या ६० वर्षापर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी लागते. योजनेचा लाभार्थी ६० वर्षांचा होताच, त्याला ५,००० रुपये पेन्शन सुरू होते. ही पेन्शन दर महिन्याला मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २० वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. दरमहा ५,००० रुपये पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल, तर ४२ रुपये ते २१० रुपये द्यावे लागतील.

उदाहरणार्थ, जेव्हा राकेश १८ वर्षांचा असेल आणि अटल पेन्शन योजनेत दरमहा ४२ रुपये गुंतवत असेल,
तर राकेश ६० वर्षांचा झाल्यावर त्याला दरमहा रु १,००० पेन्शनचा लाभ मिळेल.
दुसरीकडे, राकेशने ८४ रुपये जमा केल्यास त्याला २,००० रुपये पेन्शन मिळेल आणि २१० रुपये जमा केल्यास त्याला
५,००० रुपये पेन्शन मिळेल. जर एखाद्याने वयाच्या ४० व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केली तर त्याला दरमहा
रु. १,४५४ रु. गुंतवावे लागतील. अशाच प्रकारे, १९ ते ३९ वर्षांच्या व्यक्तीसाठी वेगवेगळी रक्कम आहे.

कुठे करायचा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत ऑनलाइन किंवा ऑफलाइन खाते उघडू शकता.
सोयीनुसार दरमहा रक्कम जमा करू शकता. या योजनेसाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बचत बँक खाते
असणे अनिवार्य आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ड्रग्सचे प्रमाण वाढले’, पोलिसांनी आळा घालण्याचं पालकमंत्र्यांचं आव्हान (व्हिडीओ)

Vishnu Prakash R Punglia IPO | १०० रुपयांपेक्षा कमीमध्ये येत आहे हा IPO, आतापासून ४० रुपयांचा फायदा