Chandrakant Patil | ‘पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ड्रग्सचे प्रमाण वाढले’, पोलिसांनी आळा घालण्याचं पालकमंत्र्यांचं आव्हान (व्हिडीओ)

Chandrakant Patil | minister chandrakant patil appealed police to control increasing drugs smuggling in pimpri chinchwad and pune

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ड्रग्सचे (Drugs) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तरुण पीढी ड्रग्सच्या आहारी जात आहे. यावर पोलिसांनी आळा घालावा, असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या (Pune Shramik Patrakar Sangh) वतीने ‘पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षांचा मागोवा व वाटचाल’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) हे दोन वर्ष इथेच राहतील तुम्ही काळजी करु नका, असा चिमटा उपस्थीत पोलीस अधिकाऱ्यांना काढला.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, सर्वांना शांत झोप यावी यासाठी पोलीस रात्र-दिवस काम करत असतात. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुणे परिसरात ड्रग्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. हे तरुण मुलांना वेगळ्या वळणाला लावत आहेत. हे आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी ‘आऊट ऑफ वे जावे’, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणी (Violence Against Women)
दामिनी पथक हे खूप स्ट्राँग करा, असे फटके द्या की दहशत निर्माण झाली पाहिजे.
ताकद एवढी वाढवायची असते की ती कधी वापरावीच लागू नये. त्याच्या भीतीनेच प्रश्न संपले पाहिजेत.
त्यामुळे दामिनी पथकांना (Damini Squad) काही अधिकार दिले पाहिजेत.
अशा दोन विषयांवर आपण लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना यावेळी केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CVC Report | गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात सर्वात जास्त भ्रष्टाचाराच्या तक्रारी, CVC रिपोर्टमध्ये खुलासा

Vishnu Prakash R Punglia IPO | १०० रुपयांपेक्षा कमीमध्ये येत आहे हा IPO, आतापासून ४० रुपयांचा फायदा

Pune Crime News | खळबळजनक! धमकी देऊन ‘ती’ अल्पवयीन मुलासोबत ठेवत होती शारिरीक संबंध, व्हिडीओ क्लिपमुळे प्रकार उघड

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)