रामराजेंचा पुतळा उदयनराजे समर्थकांनी जाळला ; फलटण ‘बंद’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात नीरा देवघरच्या पाण्यावरून चाललेल्या वादाने आज (शनिवारी) साताऱ्यात हिंसक वळण घेतले. खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी रामराजे नाईक निंबाळकरांचा पुतळा जाळल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी उदयनराजेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत फलटण बंद ची हाक दिली. हा बंद उस्फुर्तपणे पाळला गेला.

राज्य सरकारने थेट कृती करत नीरा डाव्या कालव्याच्या वादात बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दिले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही याचे आदेश काढले होते. या नंतर उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत त्यांनी जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे राखडविल्यामुळे हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले असे वक्तव्य केले होते. यामध्ये त्यांनी रामराजेंना ‘स्वयंघोषित भगिरथ’ असे म्हटले होते. यानंतर प्रत्युत्तरात रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर ‘स्वयंघोषित छत्रपती’ म्हणून टीका केली होती. यामुळे चिडून भोसले समर्थकांनी रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. हि घटना दुपारी पोवई नाका येथे घडली.

या घटनेच्या निषेधार्थ निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. यास फलटणच्या नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या बंदची सुरुवात पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरातील मोटारसायकल रॅलीने झाली. त्यांनतर महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून रामराजे नाईक निंबाळकर यांचा विजय असोच्या घोषणा देण्यात आल्या. खासदार उदयनराजे भोसले यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

उदयनराजेंनी आरोप सिद्ध करून दाखवावेत- रामराजेंचे आव्हान

मताधिक्क्य कमी भेटले म्हणून उदयनराजे आमच्यावर राग काढत असून असे उदयनराजे पक्षात राहणार असतील तर शरद पवार यांनी आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी. आपल्यावर बिनबुडाचे आरोप झालेले असून पुनर्वसनाच्या जमिनींबाबतचे आरोप उदयनराजेंनी सिद्ध करावेत असे आव्हान रामराजेंनी दिले. उदयनराजेंनी महसूल राज्यमंत्री असताना केलेले उद्योग बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी जावळी तालुक्यातील जमिनी कोणी लाटल्या? हे पहावे असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

सिनेजगत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like